Tuesday, September 26, 2023
HomeCareerIT कंपन्यात 50,000 नोकऱ्यांची संधी | IT Jobs 2023

IT कंपन्यात 50,000 नोकऱ्यांची संधी | IT Jobs 2023

पुणे | आयटी कंपनीतील नोकरी म्हणटले की चांगला पगार, भरपूर सोईसूविधा. यामुळे IT कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची अनेकांना इच्छा असते. ज्यांना आयटी कंपनीत नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण आता मोठ्या प्रमाणात फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे.

TeamLease EdTech प्लॅटफॉर्मच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील आघाडीच्या भारतीय IT कंपन्या जुलै-डिसेंबर 2023 दरम्यान देशभरात IT आणि नॉन-IT दोन्ही क्षेत्रांमध्ये सुमारे 50 हजार फ्रेशर्सना नियुक्ती (IT Jobs 2023) देण्याची तयारी करत आहेत. एड-टेक प्लॅटफॉर्मने आपल्या सर्वेक्षणात म्हटले आहे की, IT उद्योगात डिजिटल परिवर्तन उपक्रमांचा जलद अवलंब केल्यामुळे, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा आणि इतर प्रगत तंत्रज्ञानामध्ये नवीन व्यवसाय संधी निर्माण होत आहेत.

टीमलीज एडटेकचे संस्थापक आणि सीईओ शंतनू रूज यांनी दिलेल्या माहितीनुसार, एआय, ब्लॉकचेन, क्लाउड कंप्युटिंग इत्यादीसारख्या नोकऱ्या लवकरच त्यांचा ‘विदेशी’ टॅग गमावणार आहेत आणि कॅल्क्युलेटर किंवा लॅपटॉप सारखी सामान्य साधने बनणार आहेत. आज कोणत्याही कंपनीने त्यांच्या एकूण व्यवसाय धोरणात AI चा समावेश न करणे अत्यंत बेजबाबदारपणाचे ठरेल.

संपूर्ण भारतातील 18 उद्योगांमधील 737 लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर, टीमलीज अहवालात नमूद केले आहे की, जुलै-डिसेंबर 2023 दरम्यान, नवीन भरती करण्याचा कंपन्यांचा हेतू 73 टक्के आहे, यामध्ये स्टार्टअप्सचा समावेश आहे. फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा हेतू 65 टक्के आहे.

यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत फ्रेशर्सची मागणी 62 टक्क्यांच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढली आहे. जुलै-डिसेंबर 2023 मध्ये फ्रेशर्सची नियुक्ती करू इच्छिणारे शीर्ष 3 उद्योग अनुक्रमे ई-कॉमर्स आणि टेक स्टार्ट-अप 59 टक्के, दूरसंचार 53 टक्के आणि अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा 50 टक्के आहेत.

या सेक्टरमध्येही मिळणार संधी
आयटी सेक्टरशिवाय पुढील सहा महिन्यांत, उत्पादन, ई-कॉमर्स, टेलिकॉम, फार्मास्युटिकल्स इत्यादी इतर अनेक क्षेत्रांमध्ये विविध नोकऱ्यांसाठी भरती वाढू शकते. अनेक परदेशी कंपन्या भारतभर इलेक्ट्रॉनिक उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 1200 मिलियन डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक करत आहेत. या उपक्रमामुळे विविध क्षेत्रात 20,000 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय, 5G बूममुळे भारताच्या दूरसंचार बाजारपेठेतील मोठ्या कंपन्यांमध्ये प्रवेश करणाऱ्यांसाठी 1000 पेक्षा जास्त नोकरीच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे, असेही टीमलीज प्लॅटफॉर्मने म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular