कोल्हापूर | कागल तालुक्यातील बस्तवडे बंधारा येथे वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१७) दुपारी घडली आहे. बुडालेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. बस्तवडे ग्रामस्थांनी दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या घटनेनं सर्व गावावर शोककळा पसरली आहे.
आणुर गावाच्या यात्रेसाठी हे सर्वजण पाहुण्यांच्या घरी आले होते. हे सर्वजण नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर यातील चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. बुडालेल्यांमध्ये जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगूड), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय 17, अथणी, कर्नाटक) यांचा समावेश आहे.