Breaking News : नरेंद्र मोदीनी घेतली आघाडी; इंडिया आघाडीची देखील जोरदार मुसंडी | Loksabha Election 2024 Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पिछाडीनंतर आता मोठी आघाडी घेतली असून ते 16 हजाराहून अधिक मतानी आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशच्या वारणसीमध्ये नरेंद्र मोदी चौथ्या फेरीनंतर पुन्हा आघाडीवर आले आहेत. आधी मोदी 6,300 पिछाडीवर होते.  इंडिया आघाडीच्या बाबतीत व्यक्त केलेले सगळे अंदाज आणि एक्झिट पोल फोल ठरण्याच्या शक्यता आहे. कारण सकाळी साडेनऊ वाजता इंडिया आघाडी २२८ जागांवर आघाडीवर … Read more

राधानगरी: आईच्या डोक्यात कुदळीने वार, हल्ल्यात आईचा जागीच मृत्यु; किरकोळ वादातून घटना

राधानगरी | भाताची टोकण करताना आई, वडील आणि मुलगा यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून बारडवाडी (ता. राधानगरी) येथे मुलाने आईच्या डोक्यात कुदळ मारल्याने त्या जागीच ठार झाल्याची घटना घडलीय. मालुबाई श्रीपती मुसळे (वय ६२) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मुलगा संदीप श्रीपती मुसळे (३५) याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या दरम्यान येथील सुतारकीचा … Read more

करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

कोल्हापूर | आमदार पी.एन. पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. आज (23 मे ) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधी घराण्याच्या विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पी.एन. पाटील यांची … Read more

पी.एन. पाटील यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव अजूनही कमी नाही | Kolhapur News

कोल्हापूर | काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी.एन.पाटील यांची प्रकृती अजूनही गंभीरच असल्याचे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट झाले. त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव थांबायला हवा होता परंतू तो अजून थांबत नसल्याने ही चिंतेची बाब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी मुंबईतील प्रख्यात मेंदूशल्य चिकित्सक डॉ.सुहास बराले, राहूल पाटील यांनी ॲस्टर आधार रुग्णालयात आमदार पाटील यांच्यावर … Read more

Kolhapur Breaking News : कोल्हापुरातील बस्तवडे बंधाऱ्यात ४ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

कोल्हापूर | कागल तालुक्यातील बस्तवडे बंधारा येथे वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१७) दुपारी घडली आहे. बुडालेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर एकाचा शोध सुरू आहे. बस्तवडे ग्रामस्थांनी दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या घटनेनं सर्व गावावर शोककळा पसरली आहे. आणुर गावाच्या यात्रेसाठी हे सर्वजण … Read more

‘या’ देशाने Transgender लोकांना ‘मानसिक रुग्ण’ म्हणून घोषित केले; सरकार देणार मोफत उपचार | Trans People

Peru Classifies Trans People As ‘Mentally Ill’: भारतात ट्रान्सजेंडरना सामान्य नागरिकांप्रमाणे अनेक मूलभूत अधिकार प्रदान केले आहेत. मात्र जगात असा एक देश आहे ज्याने ट्रान्सजेंडर लोकांना ‘मानसिकदृष्ट्या आजारी’ घोषित केले आहे. इतकेच नाही तर, तिथले सरकार ट्रान्सजेंडरवर मोफत उपचार करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या बातमीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर ट्रान्सजेंडर्स याविषयी नाराजी … Read more

राज ठाकरे म्हणतात, “हिटलर ज्वलंत राष्ट्रभक्त, त्याच्या चांगल्या गोष्टी..” | Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांच्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. नुकतीच राज ठाकरेंनी बोल भिडूला दिलेल्या एका मुलाखतीत हिटलर बाबत काय वाटतं? याबाबत भाष्य केलं आहे. हिटलरबाबत काय म्हणाले राज ठाकरे? What did Raj Thackeray say about Hitler? “हिटलर असो किंवा चर्चिल त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोनच पूर्णपणे वेगळा होता. अॅडॉल्फ हिटलरने ज्यूंना ज्या … Read more

कॅनडामध्ये रस्ता अपघातात तीन भारतीयांचा मृत्यू | Canada Road Accident

कॅनडा | ओंटारियो प्रांतामध्ये झालेल्या रस्ते अपघातात (Canada Road Accident ) एक भारतीय दाम्पत्य आणि त्यांच्या तीन महिन्यांच्या नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका मद्याच्या दुकानावर दरोडा टाकणाऱ्या गुन्ह्यातील संशयित चुकीच्या दिशेने वाहन चालवत आल्यामुळे किमान सहा वाहनांना अपघात झाला. यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील पोलिसांनी गुरुवारी प्रस्तुत केलेल्या निवेदनात दिली आहे. टोरांटोच्या … Read more

केजरीवाल यांना जामिन मिळण्याची शक्यता; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सुतोवाच | Arvind Kejriwal

नवी दिल्ली (पीटीआय) | लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अंतरिम जामीन देण्याचा विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) सांगितले. त्यामुळे केजरीवाल यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. केजरीवाल गेल्या ४३ दिवसांपासूनईडीच्या कारवाईमुळे तिहार तुरुंगात अटकेत आहेत.  ‘ईडी’ने त्यांना दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक … Read more

ब्रिटनच्या स्थानिक निवडणुकीत ऋषी सुनक यांना धक्का; हुजूर पक्षाची पीछेहाट | PM Rishi Sunak

लंडन | ब्रिटनमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुका आणि महत्त्वाच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी हुजूर पक्षाची पीछेहाट झाल्यामुळे पंतप्रधान ऋषी सुनक (PM Rishi Sunak) यांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाने गेल्या ४० वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी नोंदवल्याचे गुरुवारी रात्रीपासून येत असलेल्या निकालातून स्पष्ट होत आहे. रविवापर्यंत संपूर्ण निकाल समजण्याची अपेक्षा आहे. विरोधी मजूर पक्षाने स्थानिक … Read more