News

चंद्र आणि सूर्यानंतर ‘गगनयान’ मोहिम; ही आहे ‘इतकी’ महाग मोहिम! Mission Gaganyaan

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वपूर्ण मानवी अवकाश मोहिमेच्या तयारीसाठीची पहिली चाचणी आज (शनिवारी) यशस्वी करण्यात आली. ‘टेस्ट व्हेईकल (टीव्ही-डी 1) या एकाच टप्प्यातील इंधन रॉकेटचे प्रक्षेपण आज सकाळी 10 वाजता करण्यात आले. (Latest Marathi News)

गगनयान (Mission Gaganyaan) हे भारताचे पहिले Human Space Mission आहे. हे मिशन तीन दिवसांचे असेल. यामध्ये तीन सदस्य असतील. त्यांना पृथ्वीच्या कक्षेत 400 किमीवर पाठविण्यात येईल. त्यानंतर या सदस्यांना सुरक्षितपणे समुद्रात उतरविण्यात येईल. यात यश आले तर अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार गगनयान मोहिमेसाठी जवळपास 90.23 अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहे.

सर्वात महागडी मोहिम –
अंदाजानुसार गगनयान मोहिम, चंद्रयान 3 पेक्षा 14 पट महाग असेल. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, गगनयान मिशन जवळपास 9023 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. तर चंद्रयान 3 मिशनासाठी 650 कोटी रुपयांचा खर्च आला होता. तर इस्त्रोच्या मिशन आदित्य L1 चे बजेट 400 कोटी रुपये होते.

‘टीव्ही-डी 1’मध्ये सुधारित विकास इंजिनाचा समावेश केलेला असून त्याच्या पुढील भागात ‘क्रू मोड्यूल’ आणि ‘क्रू एस्केप सिस्टिम’ ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. हे यान 34.9 मीटर उंच आहे आणि त्याचे वजन 44 टन आहे. (Latest Marathi News)

सुरुवातीला सकाळी 8 वाजता प्रक्षेपण होणार होते, मात्र खराब हवामानामुळे प्रक्षेपणाची वेळ बदलून सकाळी 8:45 करण्यात आली. मात्र त्यानंतर इंजिन योग्यरित्या प्रज्वलित झाले नाही. त्यानंतर इस्रोकडून तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आणि 10 वाजता यशस्वी उड्डाण करण्यात आले.

Back to top button