कशी होते ऑनलाईन फसवणूक? स्कॅमरने स्वतःच सांगितली पद्धत; व्हॉट्सअ‍ॅप चॅट होतंय व्हायरल.. एकदा नक्की पहा | Scammer WhatsApp Chat Viral

आजकाल सर्व व्यवहार मोबाईलवर होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वेगवेगळ्या शक्कल लढवून लोकांचे मोबाईल हॅक करण्याचे प्रयत्न सायबर गुन्हेगारांकडून केले जातात. आजकाल यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची देखील मदत घेण्यात येते. एका स्कॅमरने स्वतःच फसवणूक कशा पध्दतीने केली जाते आणि फसवणूक टाळण्यासाठी (Scammer WhatsApp Chat Viral) काय करावे याबद्दल माहिती दिली आहे. … Read more

गरम पाणी पिण्याचे 6 अद्भुत फायदे | 6 Ways Drinking Warm Water Can Heal Your Body

गरम पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे केवळ थंडीपासून बचाव करण्यासाठीच नाही तर अनेक शारीरिक समस्यांमध्येही उपयुक्त आहे. चला तर जाणून घेऊया गरम पाणी पिण्याचे 6 अद्भुत फायदे! 1. वजन कमी करते: गरम पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि चयापचय वाढवते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 2. त्वचेसाठी चांगले: गरम … Read more

‘लोकं काय म्हणतील’ याला फाट्यावर मारण्याची लकब सासूने दिलीय.. अशी सासू किती जणींच्या नशिबात मिळालीय? नक्की वाचा

Hello Kolhapur: लग्न करुन राजश्री पोवारांच्या घरात आले (नवऱ्याचं घर अस सहसा म्हणत नाही मी, राजश्री पोवार माझ्या सासूबाई, त्यांच्या जडणघडणीत रविराज पोवारांनी सगळं साम्राज्य उभं केलं त्यामुळं लग्न करुन मी आधी राजश्री पोवारांच्या घरात आले असं म्हणायला जास्त आवडेल) तर इथं आले आणि स्वातंत्र्य म्हणजे काय असतं हे कळलं. लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवशी काहींनी बाजूला … Read more

प्रत्येक आईने आपल्या मुलीला असं ठणकावून सांगितलं तर.. अर्थात कदाचितच!

आमच्या ओळखीत एक ताई आहेत. घरकाम करतात. त्यांच्या मुलीचं लग्न झालं गेल्यावर्षी. लग्नाला जाता आलं नाही म्हणून मी दोन तीन महिन्यांनी गेले. चहापाणी झालं. आहेराचं पाकीट देऊन झालं. गप्पा चालूच होत्या की मी विचारलं, “काय म्हणते पिंकी? रुळली का सासरी?” “हो. रुळली.” – ताई “माहेरपणाला येऊन गेली असेल ना?” – मी “हो. आखाडाची माघारीण आणली … Read more

माणसा माणसा, दगड बन!

जनरल डबा, स्लीपर आणि एसी.. किती जमीन-आस्मानचा फरक… एकाच झटक्यात सगळा ‘भारत’ दिसतो..! नाशिक रोडवरून मुंबईला येण्यासाठी रात्री पवन एक्स्प्रेससाठी थांबले होते. माझ्या सोबतीला पायाला पोलिओ झालेली एक व्यक्ती. त्यांच्याकडे अपंग सर्टिफिकेट मूळ प्रत असूनही काहीतरी कारण सांगून सवलत तिकीट दिलं नाही. मी खूप भांडले त्या कर्मचाऱ्यांशी. ‘मदत तर करतच नाहीत, पण त्या व्यक्तीचा हक्कही … Read more

कोल्हापुरचा फुटबॉल इर्षेवर की खुन्नसपणावर… Kolhapur Football

सुधाकर काशीद, तरुण भारतठराविक संघ, ठराविक खेळाडू त्यांच्यातली खुन्नस आणि शाहू स्टेडियमची ठराविक गॅलरी यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉलचा (Kolhapur Football) काही जणांच्याकडून पोरखेळ केला गेला आहे. प्रत्येक स्पर्धेत गोंधळ हा ठरलेलाच आहे. पण त्यातही कालचा गोंधळ बरा होता असे म्हणायची आता वेळ आली आहे. कोल्हापूरकरांना पेठेची अस्मिता आहे. पण अस्मिता जपता जपता खुन्नसच जास्त वाढली जात … Read more

वेदनेच्या व्याख्या मुक्या असतात, त्या माणसाला ‘सरेंडर’ व्हायला भाग पाडतात..! I QUIT..!

I QUIT…वेदनेच्या व्याख्या मुक्या असतात, त्या माणसाला ‘सरेंडर’ व्हायला भाग पाडतात..! पुरूष कणखर होता,आहे आणि असणारच पण तो सुद्धा त्याच्या मर्यादा कधी ओलांडेल आणि माणूसपणाची लख्तरं कधी वेशीला टांगेल हे कधीच कुणाला सांगता येणार नाही.. ते सिद्ध होणार नाही..! आपण पुर्वापार एकीवात असणारा ‘राम’ आणि ‘रावण’ वर आभाळ हाणत असतो पण तसं पाहिलं, ते दोघं … Read more

ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी वेळेवर भरा, अन्यथा होईल कारवाई? म्हणूनच जाणून घ्या काय आहेत याचे नियम.. Grampanchayat

ग्रामपंचायत ही राज्य व्यवस्थेचा पाया आहे. ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर कर हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीला (Grampanchayat) शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरीही तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेकदा कर वसूली नसेल तर ग्रामपंचायतींना आर्थिक अडचणी येतात. ग्रामपंचायतीच्या पट्ट्या भरणे, तसेच … Read more

जास्त काही करु नकोस.. एवढंच करुन बघ दोस्ता!

जास्त काही करु नकोस दोस्ता. राज्यातलं एक घर शोध. कोणतं घर, ते समजेलच तुला. अंधारल्या स्वयंपाकघरात भाकऱ्या थापणारी म्हातारी माय दिसेल. कपाळावरचा घाम पदराने टिपता टिपता चुलीतल्या निखाऱ्यावर ती फुंकर मारत असेल. तिच्यासमोर जाऊन बस. खोली शेणाणे सारवलेली असेल. लाजू नको. निवांत बस. ती हसून म्हणेल, ‘भूक लागली का रं लेकरा?’ होय म्हण. तवलीभर दुध … Read more

कुणबी दाखला कसा काढायचा? त्यासाठी कोणते पुरावे ग्राह्य धरणार? जाणून घ्या सविस्तर | How to get Kunbi Certificate

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल, अशी मागणी मनोज जारंगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर केली. सुरुवातीला मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या जरांगे पाटील यांनी नंतर संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे … Read more