AgricultureGovt. Scheme

PM किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची तारीख जवळ आली, जाणून घ्या सविस्तर | PM Kisan Nidhi Yojana

मुंबई | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Nidhi Yojana ) 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून 16 व्या हप्त्याची रक्कम डीबीटी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.

मात्र, काही शेतकऱ्यांना 16 वा हप्ता मिळणार नाही. कारण, ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची कागदपत्रे अपलोड करणे, सक्रिय बँक खात्याशी आधार लिंक आणि ई-केवायसी ( E-kyc) केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता मिळणार नाही. 

PM Kisan Nidhi Yojana: 9 कोटी शेतकरी कुटुंबांना मिळणार फायदा

पीएम किसान योजनेद्वारे, सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 ची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 11 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना 2.81 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी 16 वा हप्ता जारी करतील. या अंतर्गत सुमारे 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 21 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ गोष्टी गरजेच्या

पीएम किसानच्या 16 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, जमिनीची कागदपत्रे अपलोड करणे, सक्रिय बँक खात्याशी आधार लिंक करणे आणि ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे काम केले नाही त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता जमा केला जाणार नाही. म्हणजेच 16 व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. ओटीपी आधारित ई-केवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी http://pmkisan.gov.in ला भेट द्या.

2019 मध्ये PM किसान योजना सुरु

2019 मध्ये भारत सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. तेव्हापासून केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 हप्ते जारी केले आहेत. योजनेअंतर्गत, भारत सरकार वर्षातून तीन वेळा  2000 चे तीन हप्ते जारी करते. म्हणजे एका वर्षात  6000 दिले जातात. आता शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. पण आता 16 व्या हप्त्याची तारीख देखील निश्चित झाली आहे. पुढच्या आठवड्यात 28 फेब्रुवारीला PM किसानचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

महत्वाचे:

  • ज्या शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण केले नाही, त्यांना 16 वा हप्ता मिळणार नाही.
  • ज्या शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी बँक खाते जोडलेले नाही, त्यांनाही हप्ता मिळणार नाही.
  • हप्त्याबाबत कोणत्याही अडचणी असल्यास, शेतकरी PM-Kisan च्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात: 155261, 011-23381092, 011-23382401.
Back to top button