मुंबई | जिल्हा परिषदांना त्या त्या जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जिल्हा परिषदांमधील नोकरीसाठी (ZP Recruitment 2023) अनेकजण प्रयत्नशिल असतात. अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी राज्यातील विविध जिल्हा परिषदांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, नाशिक, सातारा, धुळे, वर्धा, लातूर, औरंगाबाद, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. Workmore.in ने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार खालील जिल्ह्यापरिषदांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी त्या त्या जिल्ह्यानुसार खालील लिंकवर क्लिक करून अधिक माहिती जाणून घ्यावी, आणि विहित तारखेपूर्वी अर्ज करावेत.
1. नागपूर जिल्हा परिषद भरती – 2023
2. नाशिक जिल्हा परिषद भरती – 2023
3. सातारा जिल्हा परिषद भरती – 2023
4. धुळे जिल्हा परिषद भरती – 2023
5. वर्धा जिल्हा परिषद भरती – 2023
6. लातूर जिल्हा परिषद भरती – 2023
7. औरंगाबाद जिल्हा परिषद भरती – 2023
8. यवतमाळ जिल्हा परिषद भरती – 2023
9. गडचिरोली जिल्हा परिषद भरती – 2023
वरील जिल्हा परिषदांमध्ये शेकडो पदे रिक्त असून प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्या-त्या जिल्ह्यामध्येच काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी जिल्हा परिषदांअंतर्गत असलेली नोकरीची संधी सोडू नये.