WeatherAgriculture

सावधान! देशातील ‘या’ भागात उष्णतेच्या लाटा तर या भागात अवकाळीचा जोर; कुठं कसं असेल हवामान? जाणून घ्या | Weather Update 2024

Summary : राज्यात वादळी पावसाच्या हजेरी बरोबरच कमाल तापमानही (Weather Update 2024) वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पारा 41अंशांच्या पार गेला आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे उष्णतेची लाट कायम आहे. आज (ता. 18) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा तर मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबई | देशातील वातावरणात बदल (Climate change) होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कुठे उन्हाचा तडाखा (Heat) तर कुठे अवकाळी पावसाचा (Rain) जोर वाढल्याचे (Weather Update 2024) पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (IMD) देशातील काही भागात 20 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम (Heatwave Alert) राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ (Weather Update 2024)

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. 18 ते 20 एप्रिलदरम्यान, ओडिशातील काही भागात तापमान 45 अंशावर जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच सध्या परिस्थिती पाहता, तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे ओडिसा राज्यातील सर्व शाळा 18 ते 20 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  

‘या’ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

ओडिसा, पश्चिम बंगाल, कोकण, सौराष्ट्र आणि कच्छ, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, ओडिशा या राज्यातील काही भागात येत्या पाच दिवसांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा

महाराष्ट्रात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, 20 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

गुजरातमधील तापमान वाढले 

दरम्यान, गुजरातमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होताना दिसत आहे. पुढील तीन दिवसात गुजरातमध्ये तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअसवर जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता – पंजाबराव डख

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर कायम राहणार आहे. 20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी देखील वर्तवली आहे. तसेच राज्यातील कोकण विभागात 17 ते 20 एप्रिल पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. 

यंदा सरासरीच्या 106% पाऊस

भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर झाला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यंदा मान्सून (Monsoon 2024) सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Update) चांगला पाऊस होईल, असे अंदाज IMD ने वर्तवला आहे.

Back to top button