Zomato मध्ये 800 रिक्त पदांसाठी भरती; संधी चुकवू नका | Email व्दारे करा थेट अर्ज | Zomato Recruitment

मुंबई | झोमॅटोमध्ये तब्बल 800 रिक्त जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. कंपनीचे सीईओ दिपिंदर गोयल यांनी LinkedIn वर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. झोमॅटोमध्ये पाच पदांसाठी जागा रिक्त असून एकूण 800 जागा (Zomato Recruitment) भरण्यात येणार आहेत. एकीकडे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपात सुरु असताना झोमॅटोने मात्र नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अगदी अल्प दरात करा आपल्या घराची सुरक्षा

झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी आपल्या अकाऊंटवर पाच पदांसाठी जागा असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये चीफ ऑफ स्टाफ टू सीईओ (Chief of Staff to CEO), जनरलिस्ट (Generalist), ग्रोथ मॅनेजर (Growth Manager), प्रोडक्ट ओनर (Product Owner) आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर (Software Development Engineer) यांचा समावेश आहे.

“या पाच पदांसाठी आमच्याकडे 800 जागा आहेत. या पदांसाठी जर तुमच्या ओळखीत कोणी असेल तर त्यांना टॅग करा,” असं आवाहन त्यांनी केलं आहे. या पदांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मला deepinder@zomato.com या मेल-आयडीरव मेल करा. मी किंवा माझी टीम तुम्हाला लगेच उत्तर देईल असंही त्यांनी सांगितलं आहे.