मुंबई | विणकर सेवा केंद्र, मुंबई अंतर्गत कनिष्ठ विणकर, परिचर (विणकाम), परिचर (प्रक्रिया) (Weavers Service Centre Recruitment) पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ विणकर, परिचर (विणकाम), परिचर (प्रक्रिया)
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 30 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, (WZ), विणकर सेवा केंद्र, 15-A, मामा परमानंद मार्ग, मुंबई – 400004
- अधिकृत वेबसाईट – www.handlooms.nic.in
- PDF जाहिरात – shorturl.at/beKLN
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ विणकर | 1. मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक उत्तीर्ण आणि प्रतिष्ठित संस्थेमध्ये विविध प्रकारचे कापड आणि डिझाइनचे यंत्रमाग सेट करण्याचा आणि विणकाम करण्याचा 8 वर्षांचा अनुभव असावा. 2. विणकामाच्या तयारीच्या सर्व पद्धतींमध्ये पारंगत असले पाहिजे |
परिचर (विणकाम) | 1. मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक, किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रतिष्ठित संस्थेकडून कापड विणकाम किंवा विंडिंग ट्रेडमधील डिप्लोमा. 2. संबंधित कामात दोन वर्षांचा अनुभव. |
परिचर (प्रक्रिया) | 1. मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक, किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) डिप्लोमा इन टेक्सटाईल डाईंग किंवा प्रिंटिंग किंवा फॅब्रिक प्रिंटिंग किंवा स्क्रीन प्रिंटिंग ट्रेड. 2. संबंधित कामात दोन वर्षांचा अनुभव. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ विणकर | रु. 29,200/- ते रु. 92,300/- |
परिचर (विणकाम) | रु. 18,000/- ते रु. 56,900/- |
परिचर (प्रक्रिया) | रु. 18,000/- ते रु. 56,900/- |
