व्हिडिओ जॉकी: एक नवी करिअर संधी | Video Jockey Career

मुंबई | रेडिओच्या माध्यमातून कार्यक्रम होस्ट करणारे जसे रेडिओ जॉकी किंवा RJ असतात तसाच सध्याच्या जगात झपाट्याने करियर (Video Jockey Career) म्हणून उदयास आलेला एन्टरटेन्मेंट संबंधीच्या क्षेत्रातील एक पर्याय म्हणजे व्हिडिओ जॉकी किंवा Vj. टीव्हीवर आलेल्या वेगवेगळया म्यूसिक चॅनल्समुळे, व्हिडिओ जॉकी बनणे हा एक उत्तम करिअर पर्याय बनतो आहे. व्हिडिओ जॉकी कमी वेळात पैसा, नाव आणि प्रसिद्धी मिळवू शकतो. व्हीजेचे मुख्य काम टेलिव्हिजनवरील बहुतेक म्युसिक व्हिडिओ आणि गाण्यांबद्दलची संबंधित शो होस्ट करणे असा असतो.

व्हिडिओ जॉकी करिअर:-
व्हिडिओ जॉकी करिअर म्हणून झपाट्याने विकसित झाले आहेत. एक VJ लोकांना म्युझिक व्हिडिओबद्दल माहिती देतो आणि त्याच्याशी संबंधित शो होस्ट देखील करतो. पण जसजशी स्पर्धा वाढत जाते तसतशी सर्व संगीत चॅनेल्स लोकांना, विशेषत: तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे शो समाविष्ट करण्याकडे वळत आहेत. VJ साधारणपणे प्रेक्षक आणि संगीतकार किंवा संगीत व्हिडिओ यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात. व्हिडिओ जॉकीची कमाई त्याच्या मेहनतीवर आणि शोच्या लोकप्रियतेवर अवलंबून असते.

पात्रता:-
व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी कोणत्याही विशेष शिक्षणाची किंवा कोणत्याही विशेष अभ्यासक्रमाची गरज नाही. व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी चांगली देहबोली आणि आकर्षक आवाज असणे आवश्यक आहे. मात्र, या क्षेत्रात येण्यासाठी मास कम्युनिकेशन, व्हिज्युअल कम्युनिकेशनचा कोर्स करता येतो.

कोर्स:-
बीए इन जर्नलिज्म
एमए इन मीडिया कम्युनिकेशन अँड मॅनेजमेंट
मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज
मास्टर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन
डिप्लोमा इन कम्युनिकेशन अँड मीडिया डेवलपमेंट
डिप्लोमा इन फंडामेंटल अँड ऑडियो व्हिज्युअल एजुकेशन

वैयक्तिक कौशल्य:-
व्हिडिओ जॉकी बनण्यासाठी, एखाद्याला मजा मस्ती देखील करता आली पाहिजे, खूप गंभीर राहून काम करण्याचे हे क्षेत्रच नाही. जेणेकरून शोसाठी प्रेक्षकांची आवड कायम राहील. VJ कडे सगळ्या कॉमन भाषांवर व्यवस्थित पकड हवी आणि प्रेझेंस ऑफ माईंड गरजेचं आहे. तसेच व्हीजे बनण्यासाठी संगीतप्रेमी असणे गरजेच आहे. VJ ने नेहमी गाण्यांचे नवीन ट्रेंड, नवीन व्हिडिओ, म्युझिक स्टार आणि इतर सेलिब्रिटींबद्दल अपडेट राहिलं पाहिजे. ड्रेस सेन्स, देहबोली, मधुर आवाज हेही महत्त्वाचे आहे.