CareerNews

खुशखबर: राज्यात 17 हजार पोलीसांची मेगाभरती; मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात, तयारीला लागा | Maharashtra Police Bharti 2024

मुंबई | राज्यातील राज्य राखीव पोलिस दल, तुरुंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची भरती लवकरच सुरू होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये प्रत्यक्ष भरतीला सुरुवात होईल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प आज (27 फेब्रुवारी 2024) मांडला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध घोषणा केल्या. यामध्ये राज्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच दावोसमध्ये 19 कंपन्यांबरोबर करार झाले असून त्यांचा राज्याला मोठा फायदा होईल, असंही पवार यांनी सांगितलं. (Maharashtra Interim Budget 2024 ) तसेच महाराष्ट्रात येत्या काळात पोलिस शिपायांची 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहेत. याबरोबरच अंगणवाडी सेविकांची 14 हजार पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय

येत्या काळात होणाऱ्या निवडणुका ध्यानात घेत, कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील जवळपास १८ हजार पदांची भरती करण्यात आली. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल, असेही नियोजन आखण्यात आले आहे.

राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवीन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता २६ फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल. नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल. 


मराठा आरक्षणाच्या GR नंतरच 17 हजार पदांची पोलीस भरती | Maharashtra Police Bharti Update 2024

मुंबई | गृह विभागातर्फे राज्यात जवळपास १७ हजार ७०० पदांची पोलीस भरती (Maharashtra Police Bharti Update 2024) होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन झाले आहे, परंतु मराठा समाजाला नव्याने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध केली जाणार नाही.

आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर पदभरतीची बिंदुनामावली (रोस्टर) नव्याने तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनिय सूत्रांनी दिली. तसेच राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता पाच हजाराने वाढवून ती साडेतेरा हजारांपर्यंत केली जाणार आहे.

Maharashtra Police Bharti Update 2024

दरम्यान, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी गृह विभागाने १७ हजार पद भरतीची तयारी केली होती. पण, आरक्षणाच्या निर्णयानंतर आता पदभरतीतील जागांमध्ये फेरबदल होणार असल्याने तुर्तास भरतीची जाहिरात थोडी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

राज्याची लोकसंख्या वाढली असून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन पोलिस ठाणी वाढीचेही प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहेत. मागच्या वर्षी राज्यात १८ हजार पोलिसांची भरती झाली असून त्यातील १२ हजार जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता उर्वरित सहा हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. नोव्हेंबरमध्ये यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आताच्या पदभरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यासाठी राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता पाच हजाराने वाढवून ती साडेतेरा हजारांपर्यंत केली जाणार आहे. दरम्यान, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयापूर्वी गृह विभागाने १७ हजार पदभरतीची तयारी केली होती. पण, आरक्षणाच्या निर्णयानंतर आता पदभरतीतील जागांमध्ये फेरबदल होणार असल्याने तुर्तास भरतीची जाहिरात लांबणीवर पडली आहे.

Maharashtra Police Bharti Update 2024

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षानंतर गृह विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता दिली. वाढलेली लोकसंख्या, शहरांचा विस्तार, गुन्हेगारीतील वाढ, या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडील सध्याचे मनुष्यबळ कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. नवीन पोलिस ठाण्यांच्या प्रस्तावावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे एका वर्षात दुसऱ्यांदा मोठी पदभरती केली जात आहे.

छत्तीसगढ, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश व केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या सरळसेवा भरतीत उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर २०२० ते २०२२ या तीन वर्षांत नोकरभरती निघाली नसल्याने अनेक तरूणांची नोकरीची संधी हुकली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने उमेदवारांना नवीन पोलिस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी तरूणांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.

Back to top button