१२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महावितरण पुणे अंतर्गत ३७ रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Mahavitaran Recruitment

पुणे | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे (Mahavitaran Recruitment) येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)
 • पद संख्या – 37 जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार SSC व ITI (विजतंत्री/ तारतंत्री) उत्तीर्ण असावा.
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा –
  • सवर्साधारण उमेदवार – 30 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार  – 35 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • आस्थापना नोंदणी क्र. – E05202702197
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3uCcxP5
 • ऑनलाईन नोंदणी कराhttps://cutt.ly/R1Se6ej
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)महाराष्ट्र राज्य माध्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकिय (मान्यताप्राप्त) औदयोगिक प्रशिक्षण संस्थेमधुन वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
 1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन  www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करावी.
 2. उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करताना (www.apprenticeshipindia.org) पोर्टलवर आवश्यक मुळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रितीने दि. ०६.०१.२०२३ अखेर अपलोड करणे बंधनकारक आहे.
 3. वरील कालावधीत नंतर सादर केलेल्या ऑनलाईन (Online) अर्जाचा कोणाताही विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
 4. अर्ज व मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी कार्यकारी अभियंता, यांचे कार्यालय म.रा.वि.वि.कं. मर्या., वाणखेले इमारत, दुसरा मजला, विकास थिएटर जवळ, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे स्वखर्चाने हजर राहनेचे आहे.
 5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 6. अर्ज व मुळ कागदपत्रे पडताळणीसाठीची तारीख व वेळ गुणवत्ताधारक उमेदवारांना त्यांचे ऑनलाईन (Online) अर्जामध्ये नमुद ईमेल द्वारा (Email) अवगत केली जाईल.
 7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.
 8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.