मुलाखतीस हजर रहा – इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत रिक्त पदांची भरती | IBPS Recruitment

मुंबई | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS Recruitment) अंतर्गत प्रोग्रामिंग असिस्टंटच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र उमेदवार १४ डिसेंबर २०२२ रोजी मुलाखतीला उपस्थित राहू शकतात.

मुलाखतीचा पत्ता
उमेदवार 14 डिसेंबर रोजी सकाळी 9:00 ते सकाळी 10:00 या वेळेत Institute of Banking Personnel Selection, IBPS House, 90 Feet DP रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या बाजूला, WE Highway, कांदिवली (पूर्व), मुंबई 400101 येथे मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.

पात्रता
उमेदवारांकडे B.Tech/M.C.A किंवा B.Sc- IT/B.C.A/B.Sc. संगणक विज्ञान किंवा समकक्ष पदवी असवी.
उमेदवाराची वयोमर्यादा 23 ते 30 वर्षे दरम्यान असावी.

निवड अशी होईल
कागदपत्रांची पडताळणी, शॉर्ट लिस्टिंग, ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश.
उमेदवाराने अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे मूळ स्वरूपात आणणे आवश्यक आहे.
प्रत्येकी तीन छायाप्रतींचे संच आणि A-4 पेपरमध्ये (मूळ + 2 छायाप्रती) रीतसर टाईप केलेले असणे आवश्यक आहे.

पगार
निवडलेल्या उमेदवारांना 47,043 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.