‘चित्रा ताई मेरी खास’, उर्फीनं सांगितलं चित्रा वाघ यांच्याशी तिचं भविष्यातील नातं काय असेल | Uorfi Javed Vs Chitra Wagh

मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं. चित्रा वाघ यांनी उर्फीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, पोलिसांकडे केली होती. त्यानंतर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात  सुषमा अंधारे यांनी देखील उडी घेतली. सध्या उर्फी ट्वीट शेअर करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत आहे. नुकतेच उर्फीनं एक ट्वीट शेअर केलं. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

‘उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी गं तू सास’ असं ट्वीट उर्फीनं शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. उर्फीच्या या ट्वीटला अनेकांनी लाइक केलं असून काही नेटकऱ्यांनी हे ट्वीट रिट्वीट देखील केलं आहे. 

चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अटकेची मागणी केल्यापासून उर्फी जावेद फारच आक्रमकपणे चित्रा वाघ यांना उत्तर देत असल्याचे पहायला मिळत आहे. पहिल्यांदा तिने केलेले ट्विट इतक गाजलं होत की सर्वत्र चित्रू हाच शब्द प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळत होता. त्यानंतरही उर्फीने चित्रा वाघ यांच्यावरील शाब्दिक हल्ले थांबवलेले नसून ती दररोज नवनवीन ट्विट करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे.

नेमकं प्रकरण काय?