पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये 7500 रिक्त पदांसाठी भरती; त्वरित नोंदणी करा | 10वी, 12वी, ITI, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी | New Job Openings

कोल्हापूर | महाराष्ट्रातील विविध जिल्हांमध्ये पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या संबंधित जिल्ह्याच्या लिंक वरून नोंदणी करावी. तसेच रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. या महारोजगार मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील 40 हून अधिक खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 7500 रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. (New Job Opnings)

Click Here – महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन रोजगार मेळावे

  • या पदांसाठी किमान आठवी, नववी, दहावी, बारावी उत्तीर्णांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी पात्रता असणारे महिला-पुरुष उमेदवार पात्र असतील.
  • या रोजगार मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करणारी महामंडळे, दिव्यांग उमेदवारांसाठी विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे माहिती देणारे स्टॉलही लावण्यात येणार आहेत.
  • उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.

नोंदणी कशी कराल?

  • www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दया .
  • Jobseeker (Find a Job) या Tab वरून Login Box च्या खाली REGISTER वर Click करून आधार कार्ड वरील माहिती भरल्यानंतर OTP येईल.
  • यानंतर Password तयार केलेनुसार मोबाईल वर User व Password मिळेल,
  • आपणास प्राप्त User व Password लॉगीन बॉक्स टाकुन डाव्या बाजूच्या Edit बटन मधून शैक्षणिक आणि तत्सम पात्रतेनुसार माहिती Update करणे आवश्यक आहे.
  • यानंतरच आपण रोजगार मेळावा मध्ये Online सहभागी होऊ शकता.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.