Tuesday, October 3, 2023
HomeNewsपन्हाळ्यावर महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या शूटींगवेळी तरूण तटबंदीवरून दरीत कोसळला

पन्हाळ्यावर महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या शूटींगवेळी तरूण तटबंदीवरून दरीत कोसळला

कोल्हापूर | पन्हाळा येथे महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करताना सज्जाकोटीवरून एक तरुण दरीत पडल्याची घटना घडली. रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली असून नागेश खोबरे (वय 19 रा. कराड) असे दरीत पडलेल्या तरुणाचे नाव आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सीपीआर नंतर डी.वाय. पाटील हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाचे सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. या शूटिंगमध्ये घोड्यांची देखभाल करण्याचे काम नागेश करत असल्याचे समजते.

दरम्यान, शूटिंग संपल्यानंतर नागेश फोटोग्राफीसाठी सज्जाकोटीच्या तटबंदीवर चढला. त्यावेळी पाय घसरून तो दरीत पडल्याने सहकाऱ्यांनी तात्काळ त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular