नागपूर | नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर (NIT Nagpur Recruitment) येथे “सहाय्यक अभियंता, सहाय्यक कार्यकारी अधिकारी, सहाय्यक अभियंता/ शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता/ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपीक, लघुलेखक, यांत्रिकी, फेरो अटेंडंट/ चपराशी/ कुली” पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक अभियंता, सहाय्यक कार्यकारी अधिकारी, सहाय्यक अभियंता/ शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता/ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपीक, लघुलेखक, यांत्रिकी, फेरो अटेंडंट/ चपराशी/ कुली
- पद संख्या – 24 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अर्ज आस्थापना विभाग, मुख्य कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास सदर, नागपूर – 440001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.nitnagpur.org
- PDF जाहिरात – shorturl.at/amqGI
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक अभियंता श्रेणी – १ (स्थापत्य) | गुंठेवारी अधिनियमातंर्गत अनधिकृत अभिन्यास मंजुरीची तसेच त्यामधील भुखंड नियमितीकरणाची प्रकरणे / इमारत बांधकाम नकाशा तपासणी इत्यादी हाताळण्यासंबंधाने किमान सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) या पदाचा पुरेसा अनुभव. |
सहाय्यक अभियंता श्रेणी – १ (विद्युत) | शासकीय / निमशासकीय कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या प्रकल्पातील आंतर/ बाह्य विद्युतीकरणाचे कामे, प्राकलन तयार करणे तसेच ट्रान्सफार्मर, स्ट्रीट लाईट इत्यादी तसेच हॉट मिक्स प्लॅन्ट दुरुस्ती व देखभाल करण्याचा सहाय्यक अभियंता श्रेणी – १ (विद्युत) या पदाचा पुरेसा अनुभव. |
सहाय्यक कार्यकारी अधिकारी | जमीन / न्यायालयीन / भूखंडवाटप / गाळा/दुकाने व घरकुल लिलाव तथा सोडतद्वारे तसेच लिजबाबत इत्यादि कामाचा पुरेसा अनुभव. |
सहाय्यक अभियंता श्रेणी – २ (स्थापत्य) शाखा अभियंता (स्थापत्य) / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | गुंठेवारी अधिनियमातंर्गत अनधिकृत अभिन्यास मंजुरीची तसेच त्यामधील भुखंड नियमितीकरणाची प्रकरणे / इमारत बांधकाम नकाशा तपासणी इत्यादी हाताळण्यासंबंधाने पुरेसा अनुभव. |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | गुंठेवारी अधिनियमातंर्गत अनधिकृत अभिन्यास मंजुरीची तसेच त्यामधील भुखंड नियमितीकरणाची प्रकरणे हाताळण्यासंबंधाने पुरेसा अनुभव. |
लिपीक | लेखा / न्यायालयीन / आस्थापना / जमीन / भूखंड/गाळा/दुकाने व घरकुल लिलाव/निविदा तथा सोडत द्वारे वाटपाचा तसेच लिजबाबत इत्यादि कामाचा पुरेसा अनुभव. |
लघुलेखक | मराठी १०० श.प्र.मि. लघुलेखन गति आणि मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची गति तसेच लघुलेखक/ टंकलेखनाचा पुरेसा अनुभव आवश्यक. |
यांत्रिकी | शासकीय / निमशासकीय कार्यालयात यांत्रिकी पदावर तसेच हॉट मिक्स प्लॅन्टमध्ये काम केल्याचा पुरेसा अनुभव. |
फेरो अटेंडंट / चपराशी / कुली | शासकीय / निमशासकीय कार्यालयात फेरो प्रिंटर हाताळण्यासंबंधाने पुरेसा अनुभव. |
- या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जदार शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेला असावा.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जासोबत अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, सेवानिवृत्तीच्या वेळचे वेतन, पीपीओ आदेशाची प्रत निवृत्तीवेतनाचे साक्षांकीत कागदपत्रे व कामाच्या अनुभवाचे सक्षम प्राधिकाऱ्याकडील प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.