Friday, June 9, 2023
HomeCareer10वी, 12वी, ITI, Diploma, पदवीधरांसाठी 'या' विविध जिल्ह्यात नोकरीची मोठी संधी; 4500...

10वी, 12वी, ITI, Diploma, पदवीधरांसाठी ‘या’ विविध जिल्ह्यात नोकरीची मोठी संधी; 4500 हून अधिक रिक्त जागा | Maharashtra Jobs

मुंबई | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी शासनाच्यावतीने जिल्हानिहाय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. सध्या रायगड, परभणी, वर्धा, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खालील तारखांना रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Maharashtra Jobs)

या रोजगार मेळाव्यांमध्ये विविध शैक्षणिक पात्रता धारक तरूण तरूणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी मेळाव्यामध्ये थेट मुलाखतींचे आयोजन केले जात असून उमेदवारांना जागेवर नियुक्तीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. प्रत्येक जिल्हानिहाय मेळाव्याची तारीख, मेळाव्याचा पत्ता आणि उपलब्ध जागेंचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

1. रायगड येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी, टूल आणि डाय मेकर, प्रेस ऑपरेटर, फिटर, वेल्डर, मदतनीस करिता पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा -1 चे आयोजन करण्यात आलेले आहे. एकूण 536 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 27 मे 2023 आहे.
मेळाव्याचा पत्ता – श्री समर्थ मंगल कार्यालय, समर्थ ढाबा शेजारी, मुंबई-पुणे हायवे, खोपोली ता. खालापूर जि. रायगड.

2. परभणी येथे खाजगी नियोक्ता करिता 27 मे 2023 रोजी “पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 03” चे आयोजन करण्यात आलेले आहे. एकूण 50 रिक्त जागा भरल्या जाणार असून यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर / फील्ड सेल्स / CNC मशीन पदांचा समावेश आहे. हा मेळावा ऑनलाईन पार पडणार असून खाली दिलेल्या लिंकवर उमेदवारांनी नोंदणी करून मेळाव्यास उपस्थिती लावावी.

3. वर्धा येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या 307 रिक्त जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी 29 ते 30 मे 2023 दरम्यान ऑनलाईन स्वरूपात पंडित दिन दयाल उपाध्याय जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे.

4. नाशिक येथे प्रशिक्षणार्थी, वित्त सल्लागार, विकास व्यवस्थापक, आयटीआय इलेक्ट्रिशियन, ऑफिस बॉय, ईपीपी ट्रेनीशिप, डिप्लोमा ट्रेनी, आयटीआय ट्रेनी / ऑपरेटर पदांकरिता “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” चे आयोजन करण्यात आलेले आहे. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 25 ते 28 मे 2023 आहे. नाशिक येथील रोजगार मेळाव्याअंतर्गत तब्बल 2402 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना ठक्कर डोम ग्राउंड, नाशिक येथे हजर राहावे लागणार आहे.

5. औरंगाबाद येथे EPP प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी, सेल्स एक्झिक्युटिव्ह, तंत्रज्ञ, सेवा सल्लागार, स्टोअर कीपर, लेखापाल, सेवा सल्लागार, तंत्रज्ञ, कनिष्ठ लेखापाल करिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 26 मे 2023 आहे. या मेळाव्या अंतर्गत 277 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना सकाळी 10:00 वा. अंधानेर फाटा, कन्नड येथे उपस्थित रहावे लागणार आहे.

6. सोलापूर येथे “कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, मशीन ऑपरेटर, टेक्निकल ऑपरेटर, रिलेशनशिप मॅनेजर / फील्ड सेल्स / सीएनसी मशीन, फिटर/वेल्डर/बॅक ऑफिस, वर्कर, ट्रेनी” करीता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा सोलापूर– 2 ऑनलाइन चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 26 मे 2023 आहे. या मेळाव्याव्दारे एकूण 562 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

7. चंद्रपूर येथे “प्रशिक्षणार्थी, फील्ड एक्झिक्युटिव्ह / सीएनसी मशीन / रिलेशनशिप मॅनेजर, वायर हार्नेस, मशीन ऑपरेटर” करिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 2 चंद्रपूर चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 22 ते 26 मे 2023 आहे. या मेळाव्यातून 367 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन रोजगार मेळाव्यासाठी उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या शासनाच्या अधिकृत रोजगार संकेतस्थळावर नोंदणी करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular