मुंबई | बॅंकीग क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडियन बँक अंतर्गत 7 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची (Indian Bank Recruitment 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या पदभरती अंतर्गत एकूण 21 रिक्त जागांची भरती केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आवश्यक माहिती खाली दिलेल्या PDF मध्ये पहावी.
या पदभरती अंतर्गत “प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यापैकी प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे. तसेच, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी पदांसाठी 10 जुन 2023 आहे. (Indian Bank Recruitment 2023)
इंडियन बँकेमध्ये भरती होण्यासाठी निवड प्रकियेतून जावे लागेल. यामध्ये निवड ही पात्रता, अनुभव आणि मुलाखतीच्या आधारावर होईल. यामध्ये उमेदवारांची कामगिरीही पाहिली जाणार आहे. मुलाखतीसाठी एक किंवा अधिक व्यक्ती असू शकतात. (Indian Bank Recruitment 2023)
PDF जाहिरात (प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट) | https://indianbank/pdf/1 |
PDF जाहिरात (फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी ) | https://indianbank/pdf/2 |
अर्ज नमुना (प्रॉडक्ट मॅनेजर, टीम लीड, चार्टर्ड अकाउंटंट) | https://indianbank/application/1 |
अर्ज नमुना (फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/माळी ) | https://indianbank/application/2 |
अधिकृत वेबसाईट | www.indianbank.in |
या पदभरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता याठिकाणी काम करावे लागेल. अधिक माहितीसाठी www.indianbank.in या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या पोस्ट आणि सूचनांचे तपशील काळजीपूर्वक पहावेत.