Career

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागात मोठी भरती; 63 हजार महिना पगार, ऑनलाईन अर्ज करा | PCMC Fire Brigade Bharti 2024

पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर पदाच्या 150 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे. 

  • पदाचे नाव – अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर
  • पदसंख्या – १५० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • वयोमर्यादा – 33 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूरमाध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन शिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
पदाचे नाववेतनश्रेणी
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूरएस-६- १९,९००-६३,२००

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही. अर्ज  26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातPCMC Fire Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा Apply For PCMC Fire brigade Job 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.pcmcindia.gov.in/

  • Helpline Number – +917353944436
  • Helpdesk Email – pcmchelpdesk2024@gmail.com

फॉर्म भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :

  1. Please read the Advertisement/Notice carefully before registration.
    कृपया नोंदणी करण्यापूर्वी जाहिरात/सूचना काळजीपूर्वक वाचा.
  2. Fill in the details and click on Register to proceed.
    तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी नोंदणी वर क्लिक करा.
  3. After successful registration you will receive User ID and Password to the registered Mobile Number and Email ID.
    यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  4. Fees once deposited cannot be refunded in any circumstances.
    एकदा जमा केल्यानंतर शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही.
  5. Before filling up the form, please go through the advertisement thoroughly to check the eligibility criteria for post.
    अर्ज भरण्यापूर्वी संवर्गासाठी आवश्यक पात्रता व निकष तपासून पाहण्यासाठी जाहिरात नीट वाचावी.

महानगरपालिका अंतर्गत पहिल्या टप्प्यात 150 फायरमनची सरळसेवेने भरती (PCMC Fire Brigade Bharti 2024) केली जाणार आहे. यासोबतच 10 सह अधिकारी, 06 स्थानक अधिकरी, 15 यंत्रचालक, 10 लिडिंग फायरमन अशी एकूण 191 पदांची सरळ सेवेने भरती करण्याचे अग्निशमन विभागाचे नियोजन आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. अग्निशमन विभागात कर्मचारी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयार लेल्या आकृतीबंधानुसार 191 पदांची भरती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील ‘ड’ संवर्गातील अग्निशमन विमोचन, फायरमन ही 150 रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यात येणार आहेत.

PCMC Fire Brigade Bharti 2024

लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. त्या तुलनेत अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आगताना मोठ्या अडचणी येतात, यासाठी अग्निशमन विभागात ही भरती करण्यात येणार आहे.

शहराच्या लोकसंख्येनुसार शहरागध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. शहरात झोपडपट्टयांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. मोठ्या संख्येने औद्योगिक तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या आहेत. लोकसंख्येनुसार शहरामध्ये 18 अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे.

मात्र, लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अग्निशमन विभागात प्रशासकीय कामकाजामधील अधिकारी, कर्मचारी वगळता 06 लिडिंग फायरमन तर 30 फायरमन कार्यरत आहेत. भविष्यात पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह 10 केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज आहे.

PDF जाहिरात – PCMC Fire Brigade Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा – https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

Back to top button