NewsEntertainment

‘Salam Rohit Bhai!’ मुंबई इंडियन्सने हिटमॅनसाठी लिहिलं खास गाणं, पहा गाण्याचा ‘हा’ खास व्हीडीओ

भारतीय संघाचा कर्णधार आणि सर्वांचा लाडका रो’हिटमॅन’ शर्मा आज ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. तुफान फटकेबाजी, रेकॉर्डब्रेक खेळी, उत्कृष्ट नेतृत्त्व कौशल्य आणि विनोदी अंदाज यामुळे रोहित शर्मा लहानांपासून अगदी दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांचा आवडता आहे.

रोहित शर्माने भारतीय संघासोबतच जवळपास एका दशकाहून अधिक काळ मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्त्व केले आहे. या दरम्यान त्याने संघाला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले. याच मुंबई इंडियन्सने रोहितच्या वाढदिवशी आज खास व्हीडिओ शेअर करत त्याचा वाढदिवस साजरा केला आहे.

मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रोहित शर्माचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा असे चाहते रोहित शर्माचा उल्लेख करतात अगदी त्याच थाटात रोहितचा हा व्हीडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हीडिओला ‘सलाम रोहित भाई’ (Salam Rohit Bhai) हे गाणं दिलं आहे. केजीएफ चित्रपटातील ‘सलाम रॉकी भाई’ या गाण्यावरून ‘सलाम रोहित भाई’ हे गाणं तयार करण्यात आलं आहे. गाण्याच्या शेवटी CEO of India असं बॅकग्राऊंडला लिहित पुढे रोहित शर्मा उभा असल्याचं दाखवलं आहे.

Back to top button