Entertainment

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरचा ‘हा’ लुक पाहून चाहत्यांना आली उर्फीची आठवण; कौतुक सोडाच झाली ट्रोल!

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. भूमीच्या चित्रपटांची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत असतात. उर्फी जावेद प्रमाणेच भूमी आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. नुकतचं तिने आपल्या बोल्ड आणि हटके ड्रेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. भूमीचे अतरंगी ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी या अतरंगी ड्रेसमुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. 

भूमी पेडणेकरने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळ्यात भूमी पेडणेकरने परिधान केलेला ड्रेसने चाहत्यांचं लक्ष वेधलं असलं तरी काहींनी मात्र तिला चांगलचं ट्रोल केलं आहे.

भूमी पेडणेकर ट्रोल (Bhumi Pednekar Trolled)

भूमी पेडणेकरला नेटकरी चांगलच ट्रोल करत आहेत. तिची तुलना हटके फॅशनमुळे कायम चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदसोबत (Urfi Javed) करण्यात येत आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे,”बिचारी उर्फी कारण नसताना बदनाम झाली”. दुसऱ्याने लिहिलं आहे,”भूमी पेडणेकर उर्फी जावेद होण्याचा प्रयत्न करत आहे”, तिसऱ्याने लिहिलं आहे,”उर्फीला आपण वाईट ठरवतो…पण इथे पाहा”. 

भूमीने 2014 मध्ये ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत तिने भक्षक, दम लगा के हैशा, थँक्यू फॉर कमिंग, बधाई दो, टॉयलेट:एक प्रेम कथा, अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे.

Back to top button