Thursday, June 8, 2023
HomeTechnologyHero Splendor 200 च्या फिचर्सनी लावलं वेडं.. तुमचीही खरेदी करण्याची इच्छा होईल!

Hero Splendor 200 च्या फिचर्सनी लावलं वेडं.. तुमचीही खरेदी करण्याची इच्छा होईल!

मुंबई | भारतात स्पोर्टस बाईकची मोठी क्रेझ असून स्पोर्टस् बाईक खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी हिरो देखील यामुळेच स्पोर्टस् बाईक निर्मितीत उतरल्याचे समजते. मिडीया रिपोर्टनुसार हिरो त्यांच्या सर्वाधिक खपाच्या आणि भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘स्पलेंडर’ या मॉडेलला अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीसह स्पोर्टस् बाईक (Hero Splendor 200) स्वरूपात आणण्याच्या तयारीत आहे. Autokhabri ने याबाबत वृत्त दिले आहे.

कंपनी कडून ही बाईक Splendor 200 म्हणून सादर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी ही बाइक एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करत आहे, तर दुसरीकडे Hero सध्या त्याच्या प्रोटोटाइपवरही काम करत आहे. मात्र या बाईकबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Hero Splendor 200 इंजिन क्षमता

मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला या बाईकमध्ये 199.5cc इंजिन मिळू शकते. जे तुम्हाला 24.1bhp पॉवर आणि 18.7NM टॉर्क जनरेट करण्यास सक्षम करेल. त्याचवेळी, अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की यामध्ये कंपनी काही मोठे बदल देखील करणार आहे.

Hero Splendor 200 फिचर्स

या बाईकमध्ये उपलब्ध फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला अनेक अॅडव्हान्स फीचर्स मिळू शकतात. ज्यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, रिअल टाईम मायलेज, नेव्हिगेशन, यूएसबी पोर्ट, इंजिन इंडिकेटर, बॅटरी इंडिकेटर, अँटी थेफ्ट अलार्म, लो फ्युएल इंडिकेटर, दोन स्पीकर यांसारखी वैशिष्ट्ये मिळू शकतात.

भारतात ‘या’ बाईकना देईल टक्कर

या बाईकच्या लाँचिंग बाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. पण मिडीया रिपोर्टनुसार, सन 2024 मध्ये कंपनी ही बाईक सादर करू शकते. ही बाईक लॉन्च झाल्यास भारतात ती थेट Yamaha MT15 V2, Bajaj Pulsar RS200, KTM Duke 200, Pulsar NS 200, TVS Apache RTR 200 यांसारख्या बाईकशी टक्कर देईल.

Hero Splendor 200 ची किंमत काय असेल?

सध्या तरी या बाईच्या किंमतीबद्दल काही ठोस माहिती हाती आली नसली तरी मिडीया रिपोर्टनुसार या बाईकची किंमत 2 लाखांपर्यंत असू शकते असा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बाईक भारतीय बाजारपेठेत दाखल झाल्याल ती ग्राहंकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल अशी आशा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular