ओवा खाण्याचे जबरदस्त फायदे ; Healthy Benefits of Ajwain

ओवा Ajwain हा पदार्थ आपल्याला स्वयंपाक घरात अगदी सहजासहजी उपलब्ध होतो. खूप कमी पदार्थांमध्ये ओवा वापरला जातो. ओव्यास थोडीशी तिखट व उग्र चव असते. ओव्याचा वापर भाजीमध्ये किंवा काढा तयार करण्यासाठी केला जातो, तसेच काही लोक ओव्याचे पाणी किंवा ओव्याच्या चहाचे सेवन करतात.

पचनव्यवस्था l Digestive Disorder-
ओव्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे ओव्याचा शक्य तेवढा जास्त वापर स्वयंपाकात करावा. ओवा खाल्याने चयापचय शक्ती वाढते.
पोटात आग होत असल्यास किंवा जळजळत असल्यास ओवा, बडीशेप, ज्येष्ठमध एकत्र करुन खावं.

पोटदुखी, गॅस l Gas –
अतिप्रमाणात जेवण झाल्यास किंवा सोडायुक्त पदार्थ खाल्यास पोटात गॅस होतात आणि अस्वस्थ वाटायला लागते. अशावेळी गोळ्या घेण्यापेक्षा ओवा तुपात भाजून तो कोमट पाण्यासोबत घ्यावा. यामुळे पोटदुखीवर त्वरित आराम मिळतो. लहान मुलांचे पोट दुखत असेल तर ‘ओवा अर्क’ बेंबीभोवती गोलाकार चोळून पोट शेकवावे.

सर्दी , खोकला व कफ यावर रामबाण उपाय l Cold & Cough –
वातावरणातील बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सर्दी, खोकला किंवा कफ झाल्यास ओव्याची धुरी घ्यावी. तव्यावर ओवा भाजून कापडाच्या पुरचुंडीत तो बांधून त्याचा छातीवर शेक द्याव्या. यामुळे नक्कीच आराम मिळेल.

पित्तशामक l Acidity –
पित्ताचा त्रास होत असेल तर ओवा खाणे अत्यंत हितकारक आहे. ओवा व सुंठ हे भाजून त्याची पावडर तयार करून ती दुधातून किंवा पाण्यातून घ्यावी.

सांधेदुखी l Joint Pain –
सांधेदुखीचा त्रास होत असल्यास ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास फरक जाणवेल.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त l Weight Loss –
एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा भिजत घालावा. हे पाणी सकाळी हे पाणी गाळून उपाशीपोटी घ्यावे. यामुळे वजन कमी होते.

कानदुखी l Ear Pain Relief-
कान दुखत असल्यास ओव्याचे दोन-तीन थेंब तेल कानात घालावे, आराम मिळेल व कान ठणकनेही कमी होईल.

दातदुखी l Toothache – दात दुखत असल्यास कापसाच्या बोळ्याने ओव्याचे गरम तेल दातांवर लावावे. तसेच ओव्याच्या कोमट पाण्याने गुळण्या केल्यास फरक पडतो.

वारंवार लागणारी लघवी
वारंवार लघवीला होत असल्यास गूळ आणि ओवाचूर्ण समप्रमाणात घेऊन त्याची लहानशा गोळ्या कराव्यात. या गोळ्या दोन वेळा खाव्यात.

बद्धकोष्ठता l Constipation –
पोट दुखणे, शौचास न होणे किंवा पोट फुगणे या तक्रारींमध्ये चिमुटभर ओवा आणि थोडसं सैंधव मीठ आणि सुंठ एकत्र करुन खावे.

निद्रानाश Insomnia or Sleeplessness –
आजच्या काळात वाढत्या तणावामुळे लोक निद्रानाशाचे बळी ठरतात. अशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे सेवन केल्यास झोप चांगली येते.

ओव्याच्या बिया, फुले, साली यांचाही वापर औषधांमध्ये केला जातो. सर्व आजारांवरील गुणकारी औषधी म्हणजे ओवा. पोटासंबंधीच्या आजारासाठी असो की दातांचे दुखणे,कानातील ठणक, पोटदुखी असो अनेकविध आजारांवर ओवा हा एक रामबाण उपाय ठरतो.