आरोग्यवर्धक गुळवेल काढा बनवावा कसा, काय आहेत फायदे! जाणून घ्या सविस्तर… Giloy Benefits for Health I Healthy Lifestyle

आयर्वेदामध्ये गुळवेलला ‘ अमृतकुंभ / अमृता’ असे म्हणतात. गुळवेल ही अँटीऑक्सिडंट्स घटक असणारी वनस्पती आहे जे अँटीऑक्सिडंट्स फ्री-रॅडिकल्सशी लढू शकतात. गुळवेल शरीरातील विष काढून टाकण्यास मदत करते थोडक्यात रक्तशुधी करते. शरीरातील बॅक्टेरियाशी लढते तसेच यकृताचे रोग आणि मूत्रमार्गातील संक्रमणास देखील सामोरे जाते. गुळवेल डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि मलेरिया सारख्या अनेक जीवघेण्या आजरांवरही मात करते, अशाप्रकारे गुळवेलचे अनेक फायदे आहेत. गुळवेलीचा आहारात समावेश कसा करावा याच्या अनेक पद्धती आहेत त्यापैकीच एक म्हणजे गुळवेल काढा.

गुळवेल Giloy benefits for Health काढा बनविण्यासाठी लागणारी सामग्री –

५०० मिली पाणी
४-५ गुळवेलीची पाने
गरजेनुसार हळद
एक दालचिनी
4 लवंगा
3-4 काळी मिरी
5-6 तुळशीचे पाने
2-3 पुदिना पाने
1 छोटा तुकडा आलं
2 चमचे गुळ
1 चमचा ज्येष्ठ मध
1 चमचा लिंबू रस

गुळवेल काढा बनविण्याची कृती –

एका भांड्यात पाणी उकळा आणि त्यात हळद, काळी मिरी आणि लवंगा घाला. एक मिनिट उकळू द्या आणि नंतर त्यात गूळ, तुळशीची पाने, गुळवेलीची पाने, किसलेलं आलं आणि दालचिनी घाला. झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटं उकळू द्या. नंतर पुदिन्याची पाने आणि ज्येष्ठ मध घाला, हे चांगले मिक्स करून घ्या (भांड्यावर कायम झाकण ठेवा). थंड झाल्यानंतर गाळून पिण्यासाठी घ्या.

गुळवेलचा काढा पिण्याचे फायदे Giloy benefits for Health –

. रोगप्रतिकारशक्ती वाढवते (Immunity Booster) –
गुळवेलमध्ये अँटीऑक्सिडंट व इम्यूनोमॉड्युलेटरी अर्थात शरीरात प्रतिकारशक्ती वाढविणारे गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात

२. मधुमेह (Diabetes)-
टाइप-2 प्रकारच्या मधुमेहात गुळवेल फायदेशीर असते. नियमितपणे उपाशीपोटी गुळवेल काढा सेवन केल्यास, मधुमेह आटोक्यात येण्यास मदत मिळते.

३. ताप (fever)-
साधारण 10-15 दिवसांनंतरही ताप (जुना ताप ) कमी होत नसेल तर हा ताप काढण्यासाठी गुळवेलचा काढा घ्यावा. ताप उतरण्यास मदत होईल.

४. अपचन (Digestive Disorder)-
उशीरा जेवण आणि सततचे फास्ट फूड यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. गुळवेमध्ये पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्याची गुण आहेत ज्यामुळे पचन व्यवस्थित होते.

५. डायरिया आणि जुलाब (diarrhoea)-
डायरिया आणि जुलाब होत असतील तर त्यासाठी गुळवेल काढा उपयुक्त ठरतो.

६. दमा (Asthma)-
दम्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठीही गुळवेलचा फायदा होतो. दम्याची लक्षणे कमी करण्याची प्रबळ क्षमता गुळवेलामध्ये आहे तसेच श्वासासंबंधी समस्या सोडविण्यासाठीही याचा उपयोग होतो.

७. सांधेदुखी (Joint Pain) –
गुळवेलामध्ये अँटि इन्फ्लेमेटरी – सूज कमी करणारे आणि , अँटिअर्थरायटिक – सांध्याची सूज कमी करणारे घटक असतात. तसेच अँटिऑस्टियोपोरोटिक जे सांध्याचे दुखणे आणि सूज कमी करतात. Giloy benefits for Health गुळवेलमध्ये सांध्यातील सूज व वेदना कमी करणारे गुणधर्म असतात.

गुळवेल काढा चवीला कडू आणि बेचव लागतो. गुळवेल ही वनस्पती उष्ण प्रकृतीची असते. गुळवेलाच्या पानांची भाजीसुध्दा केली जाते, ही भाजी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यदायी ठरते. गुळवेल भाजीपासून पराठेही केले जातात. अशाप्रकारे विविध आजारांवर गुळवेल गुणकारी ठरतो व तो विविध पद्धतीने आपल्याला आहारात समाविष्ट करता येतो.