दागिन्यांची आवड आहे का? मग याच क्षेत्रात करा उत्तम करिअर | Career in Jewellery Designing

मुंबई | दागिन्यांची आवड नसेल अशी एकही महिला शोधून सापडणार नाही. दागिने (Career in Jewellery Designing) म्हंटलं की महिला अगदी आनंदित होतात. दहावी पास आउटसाठीही ज्वेलरी डिझाईन हा एक उत्तम करिअर पर्याय आहे. दहावीनंतर तुम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस करू शकता. इच्छुकांना पुढील कोर्ससाठी योग्यता परीक्षा द्यावी लागते. त्यानंतरच तुम्ही कोर्ससाठी अर्ज भरू शकता. तसंच तुम्ही बारावी आणि ग्रॅज्युएशननंतरही हा कोर्स करू शकता.

लग्नसमारंभ असो की सण महिला सतत ज्वेलरी आणि दागिने घालण्यासाठी उत्साही असतात. मात्र सोनं आणि चांदीच्या वाढत्या दरांमुळे दागिने खरेदी करणं आता कठीण झालं आहे. पण हे दागिने आणि त्यांच्यावरील निरनिराळ्या डिझाइन्स येतात तरी कुठून? किंवा दागिन्यांना डिझाईन कोण देतं? असे प्रश्न तुम्हाला कधी पडले आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हेच काम तुम्हीही करू शकता. आज आम्ही तुम्हाला ज्वेलरी डिझाईनिंगमधील करिअरच्या संधींबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

 • ज्वेलरी डिझाइन ही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवण्याची कला आहे. सोने, चांदी, मोती, प्लॅटिनम (Platinum) इत्यादी धातूंचे कोरीव काम करून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात. त्याचप्रमाणे हस्तिदंत, दगड, ऑयस्टर इत्यादींचा वापर स्टाइलिश दागिने तयार करण्यासाठी केला जातो. ज्वेलरी डिझाइनर असे असतात जे दागिन्यांची शैली, नमुना इत्यादी सेट करतात.
 • ज्वेलरी डिझाईन कोर्सेस –
 • बेसिक ज्वेलरी डिझाईन
 • डायमंड आयडेंटिफिकेशन
 • Bsc इन ज्वेलरी डिझाईन
 • बॅचलर ऑफ ज्वेलरी डिझाईन
 • डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाईन अँड जेमोलॉजी
 • ज्वेलरी डिझाईन विथ CAD
 • करिअरच्या संधी
  शिक्षणानंतर तुम्ही कोणत्याही दागिन्यांच्या कंपनीत काम करू शकता. तुम्ही तुमचा स्वतःचा ज्वेलरी डिझाईनचा व्यवसाय देखील सुरू करू शकता.
  शिक्षण तुम्ही कोणत्याही दागिने तयार कंपनीत जॉब करू शकता. तसंच तुम्ही ज्वेलरी डिझाईन करण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
 • पगार तपशील 
  जर तुम्ही फ्रेशर म्हणून कंपनीत जॉब करत आहात तर तुम्हाला 10 -15 हजार पगार मिळू शकतो.
  जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला त्यानुसार पैसे मिळतील.
 • महाविद्यालये – 
  जेमोलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबई.
  सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई.
  जेम्सस्टोन आर्टिसन्स ट्रेनिंग स्कूल, जयपूर.
  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेमोलॉजी, नवी दिल्ली.
  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली.