बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ३१ रिक्त पदांची भरती सुरु; १,१२,००० पर्यंत पगार | BMC Recruitment

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment) अंतर्गत “कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ, कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ” पदांच्या 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 28 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ, कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ
 • पदसंख्या – 31 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा – प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, बांद्रा (प.),07 वा मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, मुंबई 400050.
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 28 डिसेंबर 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023 
 • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
 • PDF जाहिरात Ishorturl.at/ikRV0
 • PDF जाहिरात  IIshorturl.at/kqBIQ
पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ18 पदे
कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ13 पदे

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञरु.35400-112400
कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञरु.35400-112400
 • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.