पुणे | सध्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरीच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध आहेत. नुकतेच भारती विद्यापीठ, पुणे (Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023) अंतर्गत देखील रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भारती विद्यापिठ अंतर्गत होणाऱ्या या भरतीव्दारे “संचालक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 01 जून 2023 आहे. या रिक्त जागा पुणे, मुंबई, पालघर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या विविध जिल्ह्यांसाठी भरल्या जाणार आहेत. (Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023)
यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे 411030 या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. नमूद तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांकडे विज्ञान / कला / वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि 15 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असावा ज्यापैकी 5 वर्षे यापैकी कोणत्याही मंडळाशी संलग्न असलेल्या हायस्कूलचे प्रमुख म्हणून प्रशासनात असणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/bfpyI
ऑनलाईन अर्जाची लिंक – https://shorturl.at/ryzB3