Apple कंपनी कडून भारतात मेगाभरती | IT क्षेत्रात जॉब करायचा असेल तर संधी सोडू नका! आत्ताच अप्लाय करा | Apple Job Alert

मुंबई | अ‍ॅपल कंपनी भारतात त्यांची फ्लॅगशिप स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. (Apple Job Alert) 2015 पासून त्यांचं त्याबाबत काम सुरू आहे. कंपनीच्या सध्याच्या मोठ्या नोकरभरतीवरून लवकरच अ‍ॅपल ही दुकानं सुरू करणार असल्याचं दिसतंय. अ‍ॅपलच्या भारताच्या वेबसाइटवर पदभरतीच्या अनेक संधींबाबतची अधिसूचना कंपनीने जाहीर केली आहे. त्यात बहुतांश पदं बिग डेटा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स आणि DevOps इंजिनीअर्सची आहेत.

 • बिग डेटा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स
 • पात्रता
 • जावा आणि / पायथॉनमधलं ज्ञान
 • आकिर्टेक्ट, बिल्डिंग, एंड टू एंड काफ्का बेस्ड डेटा पाइपलाइन्समध्ये काम केल्याचा अनुभव हवा. तसंच स्पार्क जॉब्स, एअरफ्लो DAGs, ज्युपिटर नोटबुक्समध्ये अनुभव हवा.
 • डिस्ट्रिब्युटेड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीमध्ये विशेष प्रावीण्य हवं.
 • परफॉर्मन्स ट्युनिंग अ‍ॅप्लिकेशन्सची उच्च जाण असावी.
 • जबाबदारी
 • नियोजित वेळेत सोल्युशन्स देता यायला हवीत.
 • उमेदवाराला 12X7 ऑन कॉल रोटेशनमध्ये सहभागी व्हावं लागेल.
 • प्रॉडक्शन संदर्भातल्या समस्यांचं त्वरित निराकरण करण्याची जबाबदारी उमेदवारावर असेल.
 • पात्र उमेदवाराला Kubernetes किंवा container orchestration frameworks चा अनुभव घेता येईल.
 • 100 टेराबाइट्स डेटासह मोठ्या Hadoop/S3 क्लस्टरमधला अनुभवही मिळेल.

DevOps इंजिनीअर्स –
पात्रता –
सेल्सफोर्स आर्किटेक्चर, टर्मिनॉलॉजी, कॉम्पोनन्टंस, व्हर्जन प्रोपॅगेशन यावर विशेष प्रावीण्य हवं.
व्हर्जन कंट्रोल टूल्समध्ये प्रावीण्य हवं.
सेल्सफोर्स प्रॉडक्ट सूटमध्ये कम्युनिटी, सेल्स, सर्व्हिस, मार्केटिंग आणि कम्युनिटी क्लाउड्सबाबत माहिती हवी.
उमेदवाराला कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटमध्ये प्रावीण्य हवं.
AWSमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजिंगचा अनुभव हवा.
जबाबदारी –
उमेदवारानं प्रॉडक्शनमधल्या तांत्रिक समस्यांवर त्वरित सोल्युशन देणं अपेक्षित आहे.
कॉन्फिगरेशनबाबत नोंदी करणं, कठीण विषयांबाबत युझर्सना प्रशिक्षण देणं, स्टेटस रिपोर्ट लिहिणं, अ‍ॅपलचे इतर कर्मचारी व व्यवस्थापनासोबत संवाद ठेवणं.
सिस्टिमची स्टॅबिलिटी, सुरक्षा, उत्पादनक्षमता, स्केलेबिलिटी वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणं.
बॅकअप सिस्टीमची योग्य अंमलबजावणी करणं हेही एक काम असेल.
आवश्यक असल्यास 24/7 ऑन कॉल सपोर्ट द्यावा लागेल.