रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते सूज कमी करण्यापर्यंत प्रभावी: हिरव्यागार कोथिंबीरचे अनेक फायदे | Benefits Of Coriander

मुंबई | भाजीमधील (Benefits Of Coriander) सर्वात स्वस्त पदार्थ डोक्यापासून पायांपर्यंत प्रत्येक अवयवासाठी वरदान आहे. अनेक गंभीर आजारांवर कोथिंबीर मात करु शकते, कोथिंबीरशिवाय आपली प्रत्येक डिश अपूर्ण असते. कोथिंबीर खाल्ल्यामुळे आपल्या मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि के मिळतं. आयुर्वेदानुसार कोथिंबीर हे एक औषधी वनस्पती आहे. अशा या कोथिंबरचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

हिरव्यागार कोथिंबीरचे फायदे –
1. कोथिंबीर ही एंजाइम्स अॅक्टिव्ह करण्यासाठी प्रभावी ठरते. ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
2. खराब कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल कमी करण्यासाठी देखील कोथिंबीर प्रभावी आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
3. जर तुम्ही कोथिंबीर आणि धणे एकत्र खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे तुमचं रक्तदाब नियंत्रित राहतं.
4. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कोथिंबीर ही सूज कमी करण्यासाठी वरदान आहे. 
5. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त आहे. 
6. लिवरशी संबंधित समस्यांसाठी कोथिंबीर किंवा धणे खूप फायदेशीर मानले जातात. 
7. कोथिंबीरीचे सेवन मूत्रपिंडासाठी देखील खूप फायदेशीर आहे. 
8. हिरवीगार कोथिंबीर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.
9. हिरव्या कोथिंबीरमध्ये व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात असल्याने ती डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.