दातांवरील पिवळाधम्मक Tartar व Plaque या घरगुती उपायांनी कायमचा दूर करा | Yellow Teeth Whiten Remedies 

0
176

आपल्याला माहितच असेल की, दातांची योग्य काळजी न घेतल्यास तोंडाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये प्रामुख्याने दात पिवळे पडणे, तोंडातून दुर्गंधी येणे, दात किडणे (कॅव्हिटी), दातांवर काळे डाग पडणे, पायोरिया, दात आणि हिरड्यांमधून रक्त येणे, टार्टर येणे, दात आणि त्यांच्या मुळांमध्ये इजा होणे यासारख्या अनेक समस्यांचा समावेश होतो.

आपण जे काही खातो-पितो, त्याचे कण दातांमध्ये किंवा दातांच्या मुळांमध्ये अडकून राहतात, जे हळूहळू कुजून टार्टर किंवा प्लेकचे रूप घेतात. जेव्हा दातांची योग्य काळजी घेतली जात नाही, तेव्हा हा पिवळा प्लेक दात आणि हिरड्या कमकुवत करतो आणि कॅव्हिटीला तयार होते. त्यामुळे दातांचे पर्यायाने आपले आरोग्यच धोक्यात येते.

अशा स्वरूपाच्या दातांच्या समस्या निर्माण झाल्यास, अशा समस्यांवरील उपचारासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. म्हणूनच जर तुमचे दात मजबूत आणि निरोगी बनवायचे असतील तर या लेखात सांगितलेल्या टिप्स आवर्जून वापरा आणि आपल्या दातांचे पर्यायाने आपले आरोग्य जपा.

Yellow Teeth Whiten Remedies

खाण्यापिण्याच्या सवयी बदला

ब्रिटिश मेडिकल जर्नलने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, आहारात बदल करून दात किडण्याची समस्या टाळता येऊ शकते. साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने दात अधिक प्रमाणात किडतात. जर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलल्या तर तुम्हाला अशा समस्यांना कधीच सामोरे जावे लागणार नाही. जास्त कॅल्शियमयुक्त फूड घेतल्यास हाडे आणि दात मजबूत होतात. तसेच दुग्धजन्य पदार्थ (दूध, दही, मलई आणि चीज) यांच्या दररोजच्या सेवनाने देखील दातांचे आरोग्य चांगले राहते.

शुगर-फ्री च्युइंगम खा

शुगर-फ्री च्युइंगम चघळल्याने कॅव्हिटी रोखण्यास मदत होऊ शकते. च्युइंगम हे तोंडात लाळ भरते, यामुळे तोंडात आणि दातांमध्ये अडकलेले अन्न कण स्वच्छ होण्यास मदत होते आणि एसिड निरुपयोगी ठरते. एवढेच नाही तर यामुळे दातांवरचे इनेमल देखील मजबूत होते.

टूथब्रशची स्वच्छता राखा

सध्या बाजारात अनेक प्रकारचे टूथब्रश उपलब्ध आहेत. परंतु दात स्वच्छ करण्यासाठी नेहमी लहान किंवा मध्यम आकाराचा ब्रश निवडा. ब्रशचे केस तुमच्या दाढेच्या फाट्यापर्यंत पोहोचू शकतात, जिथे अन्नाचे कण अडकू शकतात. वापरल्यानंतर, ब्रश पाण्याने धुवा आणि हवेतचं सुकवा. ब्रश बाथरूममध्ये ठेवू नका कारण त्यावर अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. तसेच टूथब्रश नियमितपणे बदला, सततच्या वापरामुळे टूथब्रशचे ब्रिस्टल्स कमी होतात. त्यामुळे दातांना हानी पोहचते.

डेंटल केयर रूटीन

दात कॅव्हिटी पासून वाचवायचे असतील तर सकाळी आणि झोपण्यापूर्वी दात चांगले स्वच्छ करा. दातांचा प्रत्येक कोपरा ब्रशने स्वच्छ करा. तसेच तुमच्या हिरड्यांमधून उरलेले अन्न काढून टाकण्यासाठी फ्लॉस वापरा, सोबत माउथवॉशचा वापरही फायद्याचा ठरतो. यामुळे तोंडातील कोणत्याही शिल्लक बॅक्टेरियापासून मुक्ती मिळते.

सप्लीमेंट आणि व्हिटॅमिन्स पूरक आहार घ्या

दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन आवश्यक असतात. आहारात व्हिटॅमिन बी आणि लोह मुबलक प्रमाणात असणारे अन्न घ्या. याव्यतिरिक्त, संपूर्ण धान्यांमध्ये मॅग्नेशियम असते, एक खनिज जे कॅल्शियम शोषण्यास आणि दात मजबूत करण्यास मदत करते. तुम्हाला तुमच्या आहारातून अधिक व्हिटॅमिन डी मिळवायचे असेल तर सीफूड खाण्यावर भर द्या. सॅल्मन, हेरिंग, ट्यूना आणि मॅकेरल हे व्हिटॅमिन डी चे उत्कृष्ट स्त्रोत आहेत.

डॉक्टरांकडे जा

बऱ्याचजणांना असे वाटते की, दात चांगले घासले किंवा फ्लॉस केले की झाले, परंतु अनेक वेळा तोंडात घाण साचून राहते. त्यामुळे दातांचे आरोग्य धोक्यात येते. म्हणूनच प्लेक आणि टार्टर काढण्यासाठी दंतचिकित्सकाचा सल्ला घ्या. वर्षातून किमान एकदा दंतचिकित्सकांची भेट घेऊन दातांच्या आरोग्याची तपासणी करा.