खुशखबर: राज्यात 17 हजार पोलीसांची मेगाभरती; मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात, तयारीला लागा | Maharashtra Police Bharti 2024

मुंबई | राज्यातील राज्य राखीव पोलिस दल, तुरुंग प्रशासन व पोलिस खात्यातील १७ हजार पदांची भरती लवकरच सुरू होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये प्रत्यक्ष भरतीला सुरुवात होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प आज (27 फेब्रुवारी 2024) मांडला. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध … Read more

Google Pay Soundpod मुळे Paytmची सुट्टी.. आता कोणीही करू शकणार नाही तुमची फसवणूक! जाणून घ्या खास वैशिष्ट्ये आणि सर्व माहिती

Google Pay लवकरच भारतातील व्यापाऱ्यांसाठी ऑडिओ अलर्टसह साउंडपॉड नावाची नवीन सुविधा रोल आउट करणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांना व्यवहारांबद्दल त्वरित आणि सहजपणे सूचना मिळतील, ज्यामुळे त्यांना अधिक कार्यक्षम आणि ग्राहक-केंद्रित बनण्यास मदत होईल. Google Pay Soundpod साउंडपॉड कसे कार्य करते? साउंडपॉडचे फायदे: प्रतिस्पर्ध्यांना टक्कर: साउंडपॉड ही Google Pay द्वारे भारतातील डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये एक नाविन्यपूर्ण आणि … Read more

Manohar Joshi Passed Away: राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे (२३ फेब्रुवारी) तीनच्या सुमारास निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICUमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची … Read more

नितेश राणेंना हायकोर्टाचा दणका, पाच दिवसांत कोर्टापुढे हजर व्हा! वॉरंट रद्द करण्यास स्पष्ट नकार | Nitesh Rane

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना उच्च न्यायालयाने दणका दिला असून 26 फेब्रुवारी पर्यंत दंडाधिकाऱ्यांपुढे व्यक्तिशः हजर व्हा, असे आदेश दिलेत. नितेश राणे यांच्याविरुद्ध माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेले अजामीनपत्र वॉरंट रद्द करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट नकार दिला. न्यायालयाच्या या आदेशाने नितेश राणेंना मोठा झटका बसला आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत … Read more

जलसंधारण परिक्षेचा पेपर फुटला, विभागाच्या अधिकाऱ्यानेच फोडली प्रश्नपत्रिका! Jalsandharan Vibhag Bharti 2024

मुंबई | राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परिक्षेच्या दुसऱ्या दिवशी पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार विविध पदांसाठी परीक्षा सुरू … Read more

मराठा आरक्षण: भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर फायदा मिळणार का? जाणून घ्या काय आहे विधेयकात | Maratha Reservation Bill

मुंबई | Maratha Reservation Bill : राज्य मागासवर्गाचा अहवाल राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. या अहवालात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवण्यात आले आहे. तसेच समाजाला 10 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य मागासवर्गाचा अहवाल राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आल्यानंतर आधी सुरू झालेल्या भरती, आणि इतर … Read more

तलाठी भरती: Any Desk, TeamViewer च्या माध्यमातून सोडवले पेपर; नव्या गैरप्रकाराने खळबळ | Talathi Bharti 2024

लातूर | तलाठी भरती (Talathi Bharti 2024) घोटाळ्या संदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यामुळे प्रामाणिकपणे परिक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थांच्यात संतापाची लाठ उसळली आहे. तलाठी भरतीसाठी तब्बल दहा लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरले होते तर जवळपास आठ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परंतु या परिक्षेमध्ये गोंधळ झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. परंतु आता तलाठी … Read more

शेतकऱ्यांकडून उद्या भारत बंदची हाक! आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांची सरकारकडून डोकी फोडणे सुरूच! Farmer Protest #KisanAandolan

Farmer Protest : आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दुसरी रात्रही थंडीत हरियाणा-पंजाबमधल्या शंभू सीमेवर काढली. सरकारने चर्चा करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना पाठवला आहे. पण शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही ठोस प्रस्तावाशिवाय चर्चेतून काहीही साध्य होणार नाही. शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं की बुधवारी, 14 फेब्रुवारीला केंद्राच्या कोणत्याही मंत्र्यासोबत बैठक झालेली नाही. ही बैठक गुरुवारी, 15 तारखेला होईल. शेतकरी नेते … Read more

5 स्पटेंबर 2022 रोजीच अशोक चव्हाणांना भाजप प्रवेशासाठी दिल्या होत्या शुभेच्छा..! जुनी पोस्ट व्हायरल

तुषार गायकवाड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा तसेच विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले असले तरी राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यानच अशोक चव्हाण भाजप मध्ये जाणार असल्याचे आम्ही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते… ही पोस्ट 5 स्पटेंबर 2022 रोजी लिहिलेली असून त्याची ओरिजनल लिंक … Read more

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडला..; भाजपात सामील होणार? Ashok Chavan Resign

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरली आहे. चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटलंय की, “मी दिनांक 12/02/2024 च्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन … Read more