वेदनेच्या व्याख्या मुक्या असतात, त्या माणसाला ‘सरेंडर’ व्हायला भाग पाडतात..! I QUIT..!

0
141

I QUIT…
वेदनेच्या व्याख्या मुक्या असतात, त्या माणसाला ‘सरेंडर’ व्हायला भाग पाडतात..!

पुरूष कणखर होता,आहे आणि असणारच पण तो सुद्धा त्याच्या मर्यादा कधी ओलांडेल आणि माणूसपणाची लख्तरं कधी वेशीला टांगेल हे कधीच कुणाला सांगता येणार नाही.. ते सिद्ध होणार नाही..!

आपण पुर्वापार एकीवात असणारा ‘राम’ आणि ‘रावण’ वर आभाळ हाणत असतो पण तसं पाहिलं, ते दोघं किती श्रेष्ठ होते तरीही ‘मर्यादा’ ओलांडल्या होत्याच..!

कलयुग वगैरे सगळी कारणं आहेत माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा प्रत्येक युगात ओलांडल्या गेल्या आहेतच..! एकानं स्त्री हाकलून आणि एकानं स्त्री पळवून..!

आजही ‘लेडीज फस्ट’ म्हणून बोंब ठोकणाऱ्या जगात पुरूषप्रधान संस्कृतीचाच बोलबाला आहे, हे परत सिद्ध झालंच की..!
‘माय डॅाटर..माय प्राऊड’ असं म्हणणाऱ्या आईबापानं लेकीला नक्की काय शिकवायचंय याचा आता विचार करावा लागेल..!

तिच्या अंगावरच्या एका छिद्राची ओळख जर जन्माजन्मी प्रमाण मानली जाणार असेल तर कशाला हवा आहे आधुनिकीकरणाचा खटाटोप..!

प्रगतीच्या, हक्काच्या,स्वप्नांच्या वाटांची जर अशीच अडवणूक होणार असेल तर त्यापेक्षा गुलामीच काय वाईट होती.?
उद्या आमच्या लेकरांची या रिंगणात, या चक्रव्युहात फरफट होणार नाही याची ग्वाही कोण देणार.??
भक्कम-मनमुराद जगण्याचा विश्वास पेरणं सोपंय कदाचित तो टिकवण्यासाठीची जिद्द पेरणं अवघड झालंय, हे नक्की..!

स्मिता सुनिल
#SakshiMalik
#quitingisnoteasy
#quittingisnotanoption