8 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

भारताला 20 वर्षापूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी, जाणून घ्या विजेतेपदाच्या सामन्याची तारीख, ठिकाण, वेळ आणि संपूर्ण संघ | IND vs AUS World Cup 2023 Final

मुंबई | वनडे विश्वचषक 2023 आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या फायनलचे 2 अंतिम संघ निश्चित झाले आहेत. गुरुवारी रात्री कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय नोंदवला. तर भारत न्यूझिलंडला हरवून आधीच फायनलला पोहचला आहे. त्यामुळे 2023 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे.

IND vs AUS World Cup 2023 Final

याआधी 2003 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी या दोन्ही संघांची एकमेकांशी गाठ पडली होती. 2003 च्या विश्वचषकानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत एकमेकाशी भिडणार आहेत. त्यामुळे भारताला अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात 20 वर्षापूर्वीच्या जोहान्सबर्गमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार आहे.

20023 च्या विश्वचषक स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाने भारताचा गट टप्प्यात पराभव केला आणि त्यानंतर संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला. आता 2023 च्या विश्वचषकात टीम इंडियाने साखळी टप्प्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असून संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून तिसरा विश्वचषक जिंकण्याची भारताला संधी आहे.

क्रिकेट विश्वचषक 2023 अंतिम सामन्याचे वेळापत्रक

दिनांकम: 19 नोव्हेंबर 2023, रविवार
ठिकाण: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
वेळ: दुपारी 2 वाजता
नाणेफेक: दुपारी 1ः30 मिनिटांनी
विश्वचषकात: भारत-अपराजित, ऑस्ट्रेलिया- 9 पैकी 7 विजय
स्पोर्ट्स चॅनेल: स्टार स्पोर्ट्स
लाइव्ह स्ट्रीमिंग: डिस्नी प्लस हॉटस्टार

दोन्ही संघांतील खेळाडूंची यादी
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, प्रसिध्द कृष्णा

ऑस्ट्रेलिया-
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश हॅझलवूड, मार्कस स्टॉइनिस, अ‍ॅडम झाम्पा, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, अ‍ॅलेक्स कॅरी आणि शॉन अ‍ॅबॉट.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles