News

Breaking News : नरेंद्र मोदीनी घेतली आघाडी; इंडिया आघाडीची देखील जोरदार मुसंडी | Loksabha Election 2024 Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पिछाडीनंतर आता मोठी आघाडी घेतली असून ते 16 हजाराहून अधिक मतानी आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशच्या वारणसीमध्ये नरेंद्र मोदी चौथ्या फेरीनंतर पुन्हा आघाडीवर आले आहेत. आधी मोदी 6,300 पिछाडीवर होते. 

इंडिया आघाडीच्या बाबतीत व्यक्त केलेले सगळे अंदाज आणि एक्झिट पोल फोल ठरण्याच्या शक्यता आहे. कारण सकाळी साडेनऊ वाजता इंडिया आघाडी २२८ जागांवर आघाडीवर आहे. शिवाय जो काँग्रेस पक्ष मागच्या दहा वर्षांपासून दोन आकड्यांवर आणि तेही पन्नासच्या आतबाहेर होता. तोच पक्ष आता तीन अंकी आकडे गाठू लागला आहे.

दहा वर्षांचा वनवास संपला?

२००९ मध्ये काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या तर भाजप ११६ जागा जिंकू शकलं होतं. २०१४ मध्ये मोदी पर्वाचा उदय झाल्यानंतर काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या तर भाजपने २८२ जागांवर विजय मिळवला होता.

२०१९ मध्ये भाजपने ३०३ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर काँग्रेस ५२ जागांवर अडकून पडलं होतं. मात्र यावेळी काँग्रेसने तीन आकडे पार करत २२८ जागांवर आघाडी घेतली आहे. संध्याकाळपर्यंत नेमके आकडे हाती येतील.

पंतप्रधान मोदी सहा हजार मतानी पिछाडीवर तर राहुल गांधी 8718 मतांनी आघाडीवर

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीनंतर नरेंद्र मोदी 6 हजार 223 मतांनी पिछाडीवर गेले आहेत. काँग्रेसच्या अजय राय यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.

सकाळी 9.15 मिनिटांनी आलेला हा कल आहे. काँग्रेसच्या अजय राय यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत अजय राय यांनी 11,480 मत मिळवली आहेत. तर नरेंद्र मोदींना 5257 मत पडली आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची आकडेवारी दिली आहे. त्यामुळे देशातील सर्वात महत्वपूर्ण असलेल्या जागेवर यावेळी सुरुवातीच्या कलांमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

Back to top button