मुंबई | सरकारी बँकामध्ये नोकरी मिळवणे हे अनेक तरूण तरूणींचे स्वप्न असते. जर तुम्हीही हे स्वप्न पहात असाल आणि पदवीधरही असाल तर बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेत तब्बल 15 हजारांपेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या दोन्ही बँकांनी रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकांच्या अधिकृत वेबसाईटवरुन ऑनलाइन अर्ज करु शकतात. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कॉलेजमधून बॅचलर डिग्री घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. खाली या दोन्ही बँकामधील भरतीबाबत सविस्तर तपशील दिलेला आहे.
IDBI Recruitment 2023
IDBI बँकेने एकूण 2100 रिक्त जागंसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM), ग्रेड ‘O’ पदासाठी एकूण 800 रिक्त जागा आहेत तर एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन्स (ESO) (कराराच्या आधारावर) पदासाठी एकूण 1300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांसाठी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून किमान 60 टक्के गुणांसह बॅचलर पदवी धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2023 आहे. तर कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाइन चाचणी 31 डिसेंबर 2023, आणि एक्झिक्युटिव्ह पदासाठी ऑनलाइन चाचणी 30 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.
PDF जाहिरात – IDBI Bank Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – IDBI Bank Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
SBI CBO Recruitment 2023
स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील भारतातील विविध शाखांसाठी सर्कल बेस्ड ऑफिसर (SBI CBO) पदांच्या भरतीसाठी मोहिम हाती घेतली आहे. या भरती अंतर्गत एकूण 5280 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 22 नोव्हेंबर 2023 पासून यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली, असून 12 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. SBI CBO भरती परीक्षा जानेवारी 2024 मध्ये घेतली जाईल. 21 ते 30 या वयोगटातील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
PDF जाहिरात – SBI Circle Based Officers Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – ibpsonline.ibps.in/sbicbosep23/
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
SBI Clerk Recruitment 2023
एसबीई लिपिक भरती 2023 द्वारे कनिष्ठ सहयोगी (लिपिक) पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण 8283 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 3515 पदे, ओबीसीची 1919 पदे, ईडब्ल्यूएसची 817 पदे, अनुसूचित जातीची 1284 पदे आणि एसटी प्रवर्गातील 748 पदांचा समावेश आहे.
स्टेट बँकेच्या या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात – SBI Recruitment 2023
Online Application – Apply For SBI Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://bank.sbi/