7.4 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

Any Graduate उमेदवारांसाठी स्टेट बँकेत मेगाभरतीची घोषणा; 8283 जागा, मराठी भाषेत परिक्षा देता येणार | State Bank Bharti 2023

मुंबई | देशातील अग्रणी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने मेगाभरतीची (State Bank Bharti 2023) घोषणा केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्टेट बँकेने कनिष्ठ सहयोगी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 8283 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

State Bank Bharti 2023

वरील रिक्त पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन व विक्री) च्या 8283 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज प्रक्रिया 17 नोव्हेंबर पासून सुरू होईल आणि 7 डिसेंबर 2023 रोजी संपेल.

परिक्षा कधी होणार? – बँकेने अधिकृत अधिसूचनेत परीक्षेची तारीखही जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार, पदांच्या भरतीसाठी प्राथमिक परीक्षा जानेवारी 2024 मध्ये आणि मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये घेतली जाईल. परिक्षा महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मराठी भाषेत देखील देता येणार आहे.

शैक्षणिक पात्रता – कनिष्ठ सहयोगी पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता असणे अनिवार्य आहे. पात्रतेशी संबंधित इतर माहिती मिळविण्यासाठी, आम्ही तुम्हाला अधिकृत सूचना वाचण्याची शिफारस करतो.

वयोमर्यादा – SBI मध्ये या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया – निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी असते. 100 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी असलेली प्राथमिक परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल. ही परीक्षा 1 तास कालावधीची असेल ज्यामध्ये 3 विभाग असतील.

अर्ज शुल्क – सामान्य/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ₹750/- भरावे लागतील. तर, SC/ST/PWBD/ESM/DESM उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

PDF जाहिरात – SBI Recruitment 2023
Online Application – Apply For SBI Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://bank.sbi/

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles