मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने भरती संदर्भात नवीन अधिसूचना प्रकाशित केली आहे. नवीन अधिसूचने नुसार CBO पदांच्या एकूण 5280 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यापैकी महाराष्ट्रात एकूण 390 पदांची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
CBO पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2023 आहे. पात्र उमेदवार SBI सर्कल बेस्ड ऑफिसर व्हेकन्सी 2023 साठी 22 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज सादर करू शकता.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.
स्टेट बँक ऑफ इंडियाने काढलेल्या सर्कल बेस्ड ऑफिसर पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. भरती विभागात सक्रिय केलेल्या लिंकवरून एसबीआय सीबीओ 2023 नोटिफिकेशनमध्ये याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांनी प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे आणि नंतर दिलेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून त्यांचा अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
PDF जाहिरात – SBI Circle Based Officers Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – ibpsonline.ibps.in/sbicbosep23/
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
उमेदवारांना बँकेच्या ‘करिअर’ वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाहीत.