Tuesday, September 26, 2023
HomeCareerपदवीधरांना IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 600 रिक्त जागांची भरती | IDBI Bank...

पदवीधरांना IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 600 रिक्त जागांची भरती | IDBI Bank Recruitment 2023

मुंबई | IDBI बँक अंतर्गत तब्बल 600 रिक्त पदांसाठी नोकरीची (IDBI Bank Bharti 2023) संधी उपलब्ध झाली आहे. बँकेने जाहिर केलेल्या पदभरतीनुसार कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – जेएएम (ग्रेड ‘ओ’) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. विहीत तारखेनंतर अर्ज करता येणार नाहीत. त्यामुळे दिलेल्या मुदतीत अर्ज करण्याची काळजी घ्यावी.

  • अर्ज शुल्क –
    • राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 200/-
    • खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-

शैक्षणिक पात्रता – उमेदवार भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रताधारक असावा. केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण उमेदवार पात्र मानले जाणार नाहीत. उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे. प्रादेशिक भाषेतील प्राविण्याला प्राधान्य दिले जाईल.

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही. सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 15 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023  आहे.

PDF जाहिरात – IDBI Bank Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For IDBI Bank Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in

image

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular