नागपूर जिल्हा परिषद द्वारे शिक्षक भरती सुरु; ‘हे’ उमेदवार पात्र लगेच अर्ज करा – ZP Nagpur Bharti 2023

Share Me

नागपूर | जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत  सेवानिवृत्तशिक्षक पदांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा भरण्यासाठी (ZP Nagpur Bharti 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2023 आहे.

ऑफलाईन पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, नागपूर यांचे कार्यालय, जुने सचिवालयाचे मागे, रवीभवनचे समोर, सिव्हील लाईन्स, नागपूर 440001

ZP Nagpur Bharti 2023

1) जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.
2) बंधपत्र / हमीपत्रः नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. करार पद्धतीने नियुक्ती देतांना शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही, असे बंधपत्र / हमीपत्रः दयावे लागेल.
3) नागपूर जिल्हयाअंतर्गत असलेल्या जिल्हा परिषदेच्या कोणत्याही तालुक्यातील संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक असलेल्या शाळेतील रिक्त शिक्षकीय पदावर नियुक्ती देण्यात येईल.
4) नियुक्ती दिलेल्या शाळेत जाण्याकरीता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता किंवा इतर भत्ते देय असणार नाही. नियुक्ती दिलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचे अध्यापन कार्याकरीता जाणे बंधनकारक असेल.
5) वरिलप्रमाणे करण्यात आलेली नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यत किंवा या कार्यालयामार्फत ठरवून दिलेल्या कालावधी पर्यत असेल.
6) जाहीर सुचना व आवेदन पत्राचा / अर्जाचा नमुना www.nagpurzp.com या संकेतस्थळावर तसेच शिक्षण विभाग (प्राथमिक), जि.प. नागपूर कार्यालयाचे सुचना फलकावर व तालुका स्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

अर्जाचा नमुना  ZP Nagpur Recruitment 2023
PDF जाहिरातApply For Zilla Parishad Nagpur Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.nagpurzp.com/


Share Me