राज्यात थंडीचा कडाका वाढणार! ‘असा’ आहे पुढील हवामानाचा अंदाज.. जाणून घ्या | Weather Update

0
167

मुंबई | राज्यातील विविध भागात सकाळी आणि संध्याकाळी थंडी (Weather Update) जाणवू लागली आहे. राज्यातील तापमानात घट झाल्याने थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील बहुतांश भागात दुपारी ऑक्टोबर हीटचा चटका अजूनही जाणवत असला तरी, राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

सध्या सर्वत्र खरीपातील पिकांच्या काढणीला वेग येत आहे. तर काढणी झालेल्या ठिकाणी शेतकरी रब्बी पेरणीसाठी लगबग करत आहेत. परंतु जमिनीतील ओल पाहूनच शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीचे नियोजन करण्याचे आवाहन जाणकारांनी केले आहे.

देशातील तापमानाची स्थिती (Weather Update)

मागील 24 तासात देशातील राजकोट येथे कमाल 39 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील जळगाव येथे पारा 13.2 अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली. वातावरणातील बदलांमुळे तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

चक्रीवादळाची स्थिती काय?

बंगालच्या उपसागरात तयार झालेले हूमन चक्रीवादळ आज दुपारी बांगलादेशमधील चित्तगाव दक्षिण किनारपट्टीला जाऊन निवळले आहे. त्याचे रुपांतर कमी दाब क्षेत्रात झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. तसेच राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नसून थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.