Career

43,613 रिक्त जागांची भरती, जागेवरच मिळणार नियुक्तीपत्र.. पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर व सांगली जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक पात्रता धारकांना संधी | Pune Job Fair 2024

पुणे | बारामती येथे होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्यामध्ये 43 हजार 613 जागांवर पदभरती केली जाणार आहे. बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

या मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांची विविध दालने असून मुलाखती घेऊन जागेवरच नियुक्तीपत्र देण्याचा विविध कंपन्यांचा प्रयत्न आहे, तब्बल 311 उद्योजक या मेळाव्यामध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिक्त पदांकरीता १० वी, १२ वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन दोन मार्च रोजी सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठान संकुलातील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या मेळाव्यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, सांगली परिसरातून युवक येणार आहेत. दोन दिवस हा रोजगार मेळावा सुरू राहणार आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चहापान, भोजन व नाश्त्याची सोय राज्य शासनामार्फत मोफत केली जाणार असल्याचेही वैभव नावडकर यांनी सांगितले.

दरम्यान या मेळाव्यासाठी येणाऱ्या युवकांना कोणतीही गैरसोय सहन करावी लागू नये, या उद्देशाने आज बारामतीत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, वैभव नावडकर, गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बारामतीतील हा मेळावा उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत या मेळाव्यासाठी 14000 हून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. ऑनलाइन नोंदणी न करणाऱ्या युवकांना जागेवर आल्यानंतर देखील या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.

ज्या उद्योजक आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांनी आपल्या उद्योग आस्थापना https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration या लिंकवर नोंदणी करुन रिक्तपदे मेळाव्यासाठी अधिसुचित करावीत. तसेच नोकरी इच्छूक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करावी.


Previous Update:

पुणे | कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येत्या २ मार्च रोजी बारामती येथे आयोजित मेळाव्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे १२० पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी आत्तापर्यंत सहभाग दर्शविला असून त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे २० हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत, अशी माहिती कौशल्य विकास विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे. 

हा मेळावा विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे. रिक्त पदांकरीता १० वी, १२ वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

ज्या उद्योजक आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांनी आपल्या उद्योग आस्थापना https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration या लिंकवर नोंदणी करुन रिक्तपदे मेळाव्यासाठी अधिसुचित करावीत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करावी.

या महारोजगार मेळाव्यात विविध विभागाच्या योजनांची, स्टार्टअप व विविध महामंडळे यांच्याव्दारे स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच मेळाव्यात अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थादेखील सहभागी होणार असल्याने कौशल्य प्रशिक्षणास इच्छूक उमेदवारांना याचा लाभ घेता येईल.

उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रिज्युम) व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी व आस्थापनांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी पुणे विभागातील संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा, असेही श्रीमती पवार यांनी कळविले आहे.

Back to top button