आयुध निर्माणी कारखाना येथे 50 रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Ordnance Factory Varangaon Bharti 2023

0
4235

जळगाव | आयुध निर्माणी कारखाना वरणगाव अंतर्गत सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी), पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर जागांसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

वरील रिक्त पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

Ordnance Factory Varangaon Bharti 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा-जळगाव [एमएस]-425308

शैक्षणिक पात्रता –
सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी) – उमेदवारांनी शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात वरील उल्लेखित विषय/विषय क्षेत्रात यशस्वीरित्या पदवी पूर्ण केलेली असावी.
पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) – उमेदवारांनी वरील नमूद केलेल्या विषयांमध्ये/विषय क्षेत्रामध्ये शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा.

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातOrdnance Factory Varangaon Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://ddpdoo.gov.in/