पनवेल | महापालिका येथे नवीन पदांची भरती केली जाणार आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी आठवड्यातील प्रत्येक बुधवारी हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता – पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – 410206
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
PDF जाहिरात – Panvel Mahanagarpalika Medical Officer Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com
मुदतवाढ | 10 वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी, 377 रिक्त जागांसाठी भरती
पनवेल | पनवेल महानगरपालिका अंतर्गत एकूण 377 रिक्त जागांच्या भरतीसाठी (Panvel Mahanagarpalika Bharti 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. या भरतीला आता मुदत वाढ देण्यात आली असून आता 15 सप्टेंबर 2023 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या पदभरती अंतर्गत – “महिला व बाल संगोपन अधिकारी, क्षयरोग अधिकारी, गट-अ, हिवताप अधिकारी, गट-अ, वैद्यकीय अधिकारी, गट-अ पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर), गट-अ, महापालिका उप सचिव, गट-ब ,महिला व बाल कल्याण अधिकारी, गट-ब, माहिती व जनसंपर्क अधिकारी, गट-ब, सहायक नगररचनाकार, गट-ब, सांख्यिकी अधिकारी, गट-ब, उप मुख्य अग्निशमन अधिकारी – गट-ब, उप अग्निशमन केंद्र अधिकारी, गट-क, प्रमुख अग्निशमन विमोचक, गट-क, अग्निशामक, गट-क, चालक यंत्र चालक, गट-क, औषध निर्माता, गट-क, सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पी.एच.एन), गट-क अधि. परिचारिका (जी.एन.एम), गट-क, परिचारिका (ए.एन.एम), गट-क, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), गट-क कनिष्ठ अभियंता (विद्युत), गट-क, कनिष्ठ अभियंता (संगणक), गट-क कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट-क, कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग) गट-क, सर्व्हेअर/भूमापक, गट-क आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक), गट-क, सहायक विधी अधिकारी, गट-क, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, गट-क, सहायक क्रीडा अधिकारी, गट-क, सहायक ग्रंथपाल, गट-क, स्वच्छता निरीक्षक, गट-क, लघु लिपिक टंकलेखक, गट-क, लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी) गट-क, कनिष्ठ लिपिक (लेखा), गट-क, कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण), गट-क, लिपिक टंकलेखक, गट-क, वाहनचालक (जड़), गट-क वाहनचालक (हलके), गट-क, व्हॉलमन / कि-किपर, गट-क, उद्यान पर्यवेक्षक, गट-क, माळी, गट-ड” पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.panvelcorporation.com आणि https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (Panvel Mahanagarpalika Bharti 2023 )
PDF जाहिरात – Panvel Municipal Corporation Jobs 2023
ऑनलाईन अर्ज – Panvel Mahanagarpalika Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com
