ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती | Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Bharti 2023
नाशिक | ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, नाशिक अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी मॅनेजर ई.डी.पी, कर्ज अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Bharti 2023
वरील रिक्त पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री वल्लभ, तांबट लेन, ओझर (तांबट), ता. निफाड, जि. नाशिक
शैक्षणिक पात्रता –
मॅनेजर ई.डी.पी –
बी.ई. (कॉम्प्युटर) / बी.ई.(आय.टी.) / बी.टेक (आय.टी.) / बी.सी.एस./ बी.एस.सी. (कॉम्प्युटर) / बी.एस.सी.
कोअर बँकिंग प्रणालीमध्ये कामे करण्याचा अनुभव आवश्यक.
कर्ज अधिकारी –
बी.कॉम./ एम.कॉम./एम.बी.ए./ जी.डी.सी. ॲण्ड ए., संगणकीय ज्ञान आवश्यक
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या कागदपत्रांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे वरील पत्त्यावर अर्ज करावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Bharti 2023