0.2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

12 वी पास, B.com आणि मेडिकल पदवीधारक उमेदवारांना NHM रायगड अंतर्गत नोकरीची संधी | NHM Raigad Bharti 2023

रायगड | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (NHM Raigad Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत 12 वी पास, बी.कॉम आणि मेडिकल पदवीधर (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा) उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

या भरती अंतर्गत ‘रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष सल्लागार, जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण रायगड आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्यावर आपले अर्ज जमा करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – 12 वी पास, बी.कॉम आणि मेडिकल पदवीधार. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारीस्तर), दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिन कोड – 402201

आवश्यक कागदपत्रे –

  • विहीत नमुन्यातील अर्ज.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
  • शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला.
  • NHM, शासकिय संस्था, विभाग, शासन अंगिकृत संस्थेतील व खाजगी संस्थेतील अर्ज करित असलेल्या संबंधित पदाचा अनुभव दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • संबंधित पदाकरिता तत्सम कौन्सिलचे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र (पर्मनंट), नोंदणीचे नुतनीकरण व कौन्सिलचे आयकार्ड
  • आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, पॅनकार्ड इत्यादी.

PDF जाहिरात – NHM Raigad Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.in/

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles