भारताने न्यूझीलंडवर दमदार विजय साकारला. भारताचा हा या वर्ल्ड कपमधील पाचवा विजय आहे. यामुळे भारतीय संघाचे गुणतालिकेत 10 गुण झाले आहेत. या 10 गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. टीम इंडियाला आतापर्यंत जी गोष्ट साध्य करता आली नव्हती, ती गोष्ट या विजयानंतर शक्य झाली आहे.
भारतीय संघाने यावेळी 20 वर्षांचा पराभवाचा दुष्काळ संपवला आहे. भारतीय संघाने यापूर्वी वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला होता, तेव्हा सौरव गांगुली भारताचा कर्णधार होता. या सामन्यात झहीर खानने अचूक आणि भेदक मारा केला होता. झहीर खानने यावेळी चार बळी मिळवत न्यूझीलंडच्या संघाला एकामागून एक धक्के दिले होते. झहीरने 42 धावांत या चार विकेट्स मिळवल्या आणि न्यूझीलंडचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे झहीर खानला यावेळी सामनावीर हा पुरस्कारही देण्यात आला होता.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 2003 साली हा विजय भारताला मिळाला होता. त्यानंतर भारताला आतापर्यंत 20 वर्षांत एकदाही न्यूझीलंडला वर्ल्ड कपमध्ये पराभूत करता आले नव्हते. पण या वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत केले आणि भारताला विजय मिळवून दिला आहे.
भारतीय संघाने गेल्या 20 वर्षांच्या इतिहासात एकदाही आयसीसीच्या स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत केले नव्हते. त्यामुळे तब्बल 20 वर्षांनी भारतीय संघाने यावेळी न्यूझीलंडला आयसीसीच्या स्पर्धेत पराभूत करत हा इतिहास रचला आहे.