Tuesday, September 26, 2023
HomeCareerजलसंपदा विभागात विविध रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा | Jalsampada Vibhag...

जलसंपदा विभागात विविध रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा | Jalsampada Vibhag Bharti 2023

मुंबई | जलसंपदा विभाग अंतर्गत खारभूमी विकास मंडळात “कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता” पदांच्या रिक्त जागांसाठी पदभरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

याठिकाणी एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहा.अभि. श्रेणी २ (स्थापत्य) संवर्गातील पदावर कमीत कमी २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.

 PDF जाहिरातWRD Maharashtra Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटwrd.maharashtra.gov.in


Jalsampada Vibhag Bharti 2023
Jalsampada Vibhag Bharti 2023

जलसंपदा विभागात तब्बल 16 हजार जागा रिक्त, लवकरच भरती | Jalsampada Vibhag Bharti 2023

मुंबई | राज्याच्या जलसंपदा विभागात गेल्या 10 वर्षांपासून म्हणजेच 2013 पासून गट ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील विविध पदांच्या जागांसाठी पदभरती ( (Jalsampada Vibhag Bharti 2023) ) न झाल्यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी व राज्यात सिंचन क्षमता वाढवणाऱ्या या विभागाचा प्रश्नांकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून ही पदे लवकरात लवकर भरावीत असे निवेदन काही दिवसांपूर्वी देण्यात आले आहे.

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, गट ‘क’ वर्गाची सरळसेवा – 8014, पदोन्नती- 3163 अशी एकुण- 11177 पदे रिक्त आहेत तर गट ‘ड’ वर्गाची सरळसेवा – 4702, तर पदोन्नतीने 306 अशी एकूण 5008 पदे 31 मार्च 2023 पर्यंत रिक्त होती. (Jalsampada Vibhag Bharti 2023)

31 मार्च 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे. या विभागाची गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गाची रिक्त पदे भरण्यासंदर्भात (WRD Maharashtra Bharti 2023) 2013 पासून एकही जाहिरात न आल्याने रिक्त पदांची संख्या वाढली असून ही पदे या वर्षी तरी भरावीत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याच्याकडे कोंकण विभाग कृषी पदवी व पदविकाधारक संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

या पदांसाठी केवळ कृषी पदवी, पदविका ही शैक्षणिक अर्हता करण्याची मागणी कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. तसेच राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी व राज्यात सिंचन क्षमता वाढवणाऱ्या या विभागाचा प्रश्नांकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून ही पदे लवकरात लवकर भरावीत असे निवेदन दिले आहे.

गट ‘क’ आणि गट ‘ड’ वर्गातील रिक्त पदांचा तपशील

गट ‘क’ –
1. प्रथम लिपिक : 55 जागा
2. आरेखक : 144 जागा
3. भांडारपाल : 68 जागा
4. सहाय्यक आरेखक : 191 जागा
5. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : 2571 जागा
6. वरिष्ठ लिपिक : 705 जागा
7. अनुरेखक : 976 जागा
8. संदेशक : 190 जागा
9. टंकलेखक : 53 जागा
10. वाहनचालक : 824 जागा
11. कनिष्ट लिपिक : 1,968 जागा
12. सहाय्यक भांडारपाल : 181 जागा
13. दप्तरी कापकून : 534 जागा
14. मोजणीदार : 951 जागा
15. कालवा निरीक्षक : 1,471 जागा

गट ‘ड’
1. नाईक : 245 जागा
2. शिपाई : 2,357 जागा
3. चौकीदार : 1,057 जागा
4. कालवा चौकीदार : 784 जागा
5. कालवा टपाली : 330 जागा
6. प्रयोगशाळा परिचर : 152 जागा
7. तप्तरी : 6 जागा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular