साउथ स्टार प्रभासची देशभरात मोठी क्रेझ आहे. बॉलिवूडमध्येही प्रभास आता लोकप्रिय झाला आहे. 23 ऑक्टोबर 1979 मध्ये जन्मलेला प्रभास आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तुम्हाला प्रभास बद्दल एक गोष्ट नक्कीच माहित नसेल आणि ती म्हणजे, आज सिनेसृष्टीत बाहुबलीसारखे हिट सिनेमे देणाऱ्या प्रभासला कधीही सिनेमात काम करायचे नव्हते. इंडस्ट्रीत प्रभास नावाने पॉप्युलर असलेल्या या अभिनेत्याने खरे नाव देखील वेगळेच आहे.
प्रभासचे नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती असे आहे. त्याच्या कुटुंबात आधीपासून फिल्मी बॅकग्राउंड होते. तो निर्माते यू सूर्यनारायण राजू आणि शिव कुमारी यांचा मुलगा आहे. प्रभासने २००२ मध्ये पहिल्यांदा सिनेमात एन्ट्री केली, त्याचा पहिला सिनेमा ‘ईश्वर’ तेलुगू होता. पण प्रभासला कधीही सिनेमात यायचे नव्हते. सिनेमात येण्याआधी त्याला व्यावसायिक बनायचे होते. त्याला स्वत:चं हॉटेल सुरू करायचे होते.
अभिनय क्षेत्रात येण्याआधी प्रभासने बीटेकचं शिक्षण घेतले आहे. त्याने हैदराबाद येथील श्री चैतन्य कॉलेजमधून इंजिनिअरिंगची डिग्रीही मिळवली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने सिनेमात एन्ट्री केली. सिनेमात येण्याआधी त्याचे हॉटेलच्या एका मोठ्या चेनचा मालक बनवण्याचे स्वप्न होते. पण नशीबाने त्याला झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवायला लावले. आज प्रभास भारतातील सर्वात महागडा स्टार आहे.
दरम्यान, प्रभास सध्या त्याच्या आगामी दोन बिग बजेट सिनेमांमुळे चर्चेत आहे. या वर्षाअखेरीस तो सालार सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची टक्कर शाहरुख खानच्या डंकी सिनेमाशी होणार आहे. याआधी प्रभास आदिपुरुष सिनेमात दिसला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आगामी काळात प्रभास कल्कि 2898 एडी या सिनेमातही दिसणार आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.